मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Dombivli News : डोंबिवलीत पावसाचा कहर! एक तासात जलप्रलय; शहर ठप्प!

" नालेसफाई पूर्ण झाली" हा पालिकेचा दावा पाण्यात गेला !

V
Vivek

1 मिनिट वाचन

Dombivli News : डोंबिवलीत पावसाचा कहर! एक तासात जलप्रलय; शहर ठप्प!

"नालेसफाई पूर्ण झाली" हा पालिकेचा दावा पाण्यात गेला!

डोंबिवली :- बुधवारी दुपारी डोंबिवली आणि कल्याण परिसरात निसर्गाने आपला रौद्र अवतार दाखवला. सकाळपासून उन्हात आणि ढगांमध्ये सुरू असलेला खेळ अचानक दुपारी मुसळधार पावसात बदलला. घड्याळभरात आकाश काळ्या ढगांनी व्यापलं आणि जोरदार वाऱ्यांसह पाऊस कोसळू लागला. या अवकाळी तडाख्यामुळे शहराची वाहतूक आणि जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले.

कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालय, उदवाहन परिसर, आणि खासदारांच्या बंगल्यासमोरील रस्ते जलमय झाले. गुडघाभर पाण्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. काही भागात पादचारी रस्ता ओलांडू शकले नाहीत, तर बाजारपेठांमध्ये विक्रेत्यांची धांदल उडाली. दुकानांबाहेर लावलेला माल भिजल्याने व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसानही झाले.

रेल्वे स्थानकांबाहेरही प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. छत्री नसल्यानं अनेक प्रवासी पावसात अडकले. काही रिक्षाचालकांनी पाणी तुंबल्यामुळे रिक्षा बंद ठेवल्या. डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभाग कार्यालयासमोरील रस्ता पूर्णतः पाण्याखाली गेला.

महापालिकेने नालेसफाई झाली असल्याचा दावा वारंवार केला असला तरी उमेशनगर, देवीचा चौक या भागातील गटारं तुंबलेलीच असल्याचं स्पष्ट झालं. स्थानिकांनी संतप्त प्रतिक्रिया देताना म्हटलं, “दर वर्षी याच समस्या! पालिका फक्त कागदोपत्री तयारी करते.”

हेही वाचा: Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरद पवार) मोठा बदल: जगन्नाथ काकडे यांची 'किसान सेल महाराष्ट्र राज्यप्रमुख' पदावर नियुक्ती

शेअर करा