मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Dharmendra Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सरकारने मागितली २४ तासांचा वेळ

नवी दिल्ली, महाराष्ट्र मिरर

DO
Dhanshree Otari

2 मिनिट वाचन

Dharmendra Pradhan

Dharmendra Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सरकारने मागितली २४ तासांचा वेळ

नवी दिल्ली, महाराष्ट्र मिरर

Dharmendra Pradhan : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाने आता महत्त्वपूर्ण वळण घेतले आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) शिष्टमंडळाची आणि केंद्र सरकारच्या प्रतिनिधींची शुक्रवारी कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियामध्ये अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीत सीजेपीच्या प्रमुख मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली असून, सरकारने दोन महत्त्वाच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका दर्शवली आहे. मात्र, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी सरकारने उद्या (शनिवार) दुपारी २ वाजेपर्यंतचा अवधी मागितला आहे. Dharmendra Pradhan resign bjp neet

सीजेपीच्या वतीने सरकारसमोर तीन मुख्य मागण्या ठेवण्यात आल्या होत्या. नीट परीक्षेशी संबंधित आणि शिक्षण क्षेत्रातील विविध प्रकरणांची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ राजीनामा द्यावा. नीट परीक्षा आणि इतर गैरप्रकारांमुळे नैराश्यातून किंवा यासंबंधीच्या घटनांमध्ये जीव गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यावी. आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थी व कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले सर्व एफआयआर (FIR) आणि इतर कायदेशीर कारवाई त्वरित मागे घेण्यात यावी.

Tech Mahindra : आजारी मुलीच्या संगोपनासाठी रजा घेतल्याने कर्मचाऱ्याला बडतर्फ; टेक महिंद्राच्या दुंडीगल कॅम्पसबाहेर तीव्र निदर्शने

सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रंका यांनी बैठकीनंतर माहिती दिली की, सरकारने तीनपैकी दोन मागण्यांवर तत्त्वत: सकारात्मक संकेत दिले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याच्या आणि आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या मुद्द्यावर सरकार अनुकूल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. Dharmendra Pradhan

मात्र, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मुद्यावर सरकारकडून अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. हा अत्यंत संवेदनशील आणि उच्च पातळीवरील निर्णय असल्याने, त्यावर विचार करण्यासाठी सरकारने उद्या दुपारपर्यंतचा वेळ मागितला आहे.

Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांचे २६ दिवसांनंतर उपोषण समाप्त; केंद्र सरकारकडून मागण्या मान्य

सोनम वांगचूक यांनी यापूर्वी आपले उपोषण मागे घेतले असले, तरी सीजेपीने जोपर्यंत सर्व मागण्या मान्य होत नाहीत आणि अंतिम निर्णय येत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील, असा स्पष्ट निर्धार व्यक्त केला आहे. उद्या दुपारी २ वाजेपर्यंत सरकार यावर काय अधिकृत निर्णय देणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. Dharmendra Pradhan

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

शेअर करा