मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Crime : धनकवडीतील दहीहंडी उत्सवात अश्लील नृत्य प्रकार

Pune News पुणे : पुण्यातील धनकवडी परिसरातील तीन हत्ती चौक येथे दहीहंडी उत्सवाच्या नावाखाली सार्वजनिक ठिकाणी अश्लील गाण्यांवर अश्लील नृत्य सादर केल्याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

धनकवडीतील दहीहंडी उत्सवात अश्लील नृत्य प्रकार
धनकवडीतील दहीहंडी उत्सवात अश्लील नृत्य प्रकार

Pune Crime : अष्टविनायक मित्र मंडळाचे अध्यक्ष पवन डोंगरे, उपाध्यक्ष सागर सोनवणे, लावणी नृत्यांगना निशा मुंबईकर आणि तिच्यासोबतच्या इतर चार महिला कलाकारांवर गुन्हा दाखल

Pune News पुणे: पुण्यातील धनकवडी परिसरातील तीन हत्ती चौक येथे दहीहंडी उत्सवाच्या नावाखाली सार्वजनिक ठिकाणी अश्लील गाण्यांवर अश्लील नृत्य सादर केल्याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरातील गणेशोत्सव व दहीहंडी आयोजकांमध्ये खळबळ उडाली आहे.https://maharashtramirror.com/ Pune crime

मिळालेल्या माहितीनुसार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ९:०० वाजताच्या सुमारास धनकवडीतील तीन हत्ती चौक येथे 'अष्टविनायक मित्र मंडळ' यांच्या वतीने दहीहंडी उत्सव व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महाराष्ट्राची लोककला व सांस्कृतिक परंपरांचा अवमान करत, धार्मिक कार्यक्रमाच्या मंचावर अश्लील गाणी वाजवून त्यावर नृत्यांगनांकडून अश्लील नृत्य सादर करण्यात आले.https://maharashtramirror.com/ Pune Crime

पूर्वपरवानगी शिवाय कार्यक्रमाचे आयोजन


महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ, मुंबई यांच्या नियमावलीनुसार तसेच पुणे शहर पोलीस प्रशासनाकडून अशा प्रकारच्या सार्वजनिक व धार्मिक कार्यक्रमांसाठी आवश्यक असणारी पूर्वपरवानगी आयोजकांनी घेतली नव्हती. तसेच, पुणे शहराचे अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) यांनी जारी केलेल्या सार्वजनिक आदेशांचे उल्लंघन करण्यात आले.https://maharashtramirror.com/ Pune crime

याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल शेषेराव राठोड यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अष्टविनायक मित्र मंडळाचे अध्यक्ष पवन सूर्यकांत डोंगरे (रा. चव्हाणनगर, धनकवडी) आणि उपाध्यक्ष सागर सोनवणे (रा. चव्हाणनगर, धनकवडी) यांच्यासह प्रसिद्ध लावणी नृत्यांगना निशा मुंबईकर आणि तिच्यासोबतच्या इतर चार अनोळखी महिला कलाकारांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलीस प्रशासनाने भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २२३ (सरकारी आदेशाचे उल्लंघन), कलम २९६ (सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य/गाणी) आणि कलम ३(५) अंतर्गत ही कारवाई केली आहे. सदर घटनेचे सी.सी.टी.वी. फुटेज आणि ई-साक्ष पुरावे पोलिसांच्या हस्तगत झाले असून तपासात ते महत्त्वाचे पुरावे ठरणार आहेत.

सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेश खांडेव आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय तोटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सोनाली मिठारे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. सार्वजनिक व धार्मिक उत्सवांचे औचित्य साधून अश्लीलतेचा प्रसार करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

शेअर करा