मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर महिलेचा गोंधळ, नेम प्लेट काढून फेकली

Devendra Fadnavis office attack: : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात अज्ञात महिलेने घुसून गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Devendra Fadnavis office attack

Devendra Fadnavis office attack: : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात अज्ञात महिलेने घुसून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मुंबई :- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर आज (27 सप्टेंबर) एका महिलेने गोंधळ घातला. त्यांनी उपमुख्यमंत्र्यांची नेम प्लेट काढून खाली फेकली. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर ही घटना घडली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात महिलेचा चेहरा दिसत आहे. पोलिसांनी अज्ञात महिलेचा शोध सुरू केला आहे. Devendra Fadnavis office attack

एका अनोळखी महिलेने अचानक देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील‌ कार्यालय बाहेर गोंधळ घातला. या घटनेने खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित महिला पास न घेताच मंत्रालयात दाखल झाली होती. ही महिला सचिवालयाच्या गेटमधून मंत्रालयात दाखल झाली.पोलीस आयुक्तांनी ही घटना गांभीर्याने घेतली असून महिलेचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी समोर आल्या आहेत. ही महिला गुरुवारी रात्री मंत्रालयात दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावेळी मंत्रालय परिसरात पोलिसांची फारशी उपस्थिती नव्हती. त्यामुळेच ही महिला कोणाच्याही लक्षात न येता सहज सचिवालयाच्या गेटमधून आत शिरली. Devendra Fadnavis office attack

हेही वाचा: Badalapur Akshay Shinde Case : अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांची मागणी, 'अंतिम संस्कारासाठी पोलीस संरक्षण मिळावे'

हेही वाचा: Saamna Lekh : Saamna Lekh यांना डोहाळे लागले आहे ; सामना अग्रलेख

शेअर करा