मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Devendra Fadnavis : अखेर…अक्षय्य तृतीयाचा मुहूर्त साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वर्षा बंगल्यावर गृहप्रवेश!

•देवेंद्र फडणवीस यांची कन्या दिवीजा हिला दहावीच्या परीक्षेत 92 टक्के मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एका ट्विटद्वारे ही माहिती दिली

V
Vivek

1 मिनिट वाचन

Devendra Fadnavis : अखेर…अक्षय्य तृतीयाचा मुहूर्त साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वर्षा बंगल्यावर गृहप्रवेश!

•देवेंद्र फडणवीस यांची कन्या दिवीजा हिला दहावीच्या परीक्षेत 92 टक्के मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एका ट्विटद्वारे ही माहिती दिली

मुंबई :- देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन शंभरहून अधिक दिवसाचा कालावधी उलटून गेला आहे. अखेर देवेंद्र फडणवीस यांनी अक्षय्य तृतीयेचे मुहूर्त साधत वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत शासकीय निवासस्थानी राहण्यासाठी गेलेत. तसेच देवेंद्र फडणवीस यांची कन्या दिवीजा तिला दहावीच्या परीक्षेत 92.60 टक्के गुण मिळाल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या आल्यानंतर एक हाती सत्ता हाती घेतल्यानंतर 5 डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पद व गोपनीयतेची शपथ घेतली होती.पण तेव्हापासून ते 'सागर' या आपल्या जुन्याच निवासस्थानी राहत होते. कारण, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगला सोडला नव्हता. त्यामुळे मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर केव्हा राहण्यास जाणार? असा प्रश्न सातत्याने विरोधकांकडून उपस्थित केला जात होता. अखेर अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर फडणवीस यांनी वर्षा बंगल्यात सपत्नीक गृहप्रवेश केला. अमृता फडणवीस यांनी एका पोस्टद्वारे या गृहप्रवेशाची माहिती दिली. तसेच काही फोटोही शेअर केले.

सर्वांना अक्षय तृतीयेनिमित्त हार्दिक शुभेच्छा. आजच्या शुभमुहूर्तावर वर्षा या निवासस्थानी आम्ही छोटीशी पूजा संपन्न करीत गृहप्रवेश केला. आजच्या दिवशीची आणखी एक अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सर्वांना सांगताना मन खुशीने भरून गेलंय, आमची सुकन्या दिविजा ही 10 वी च्या बोर्ड परीक्षेत 92.60 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे, असे अमृता फडणवीस यांनी एका पोस्टद्वारे सांगितले आहे.

हेही वाचा: Hussain Dalwai : काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांचे वादग्रस्त विधान, आरएसएसला दहशतवादी संघटना म्हटले

शेअर करा