मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Delhi Student Suicide News : दिल्लीत मराठी विद्यार्थ्याची आत्महत्या! शिक्षिकांच्या जाचाला कंटाळून मेट्रो स्टेशनवरून घेतली उडी

Delhi Marathi Student Suicide News : 'स्कूलवालोंने इतना बोला की, मुझे यह करना पडा'; 10 वीतील शौर्य पाटीलच्या सुसाईड नोटमधून धक्कादायक खुलासा

V
Vivek

1 मिनिट वाचन

Delhi Student Suicide News : दिल्लीत मराठी विद्यार्थ्याची आत्महत्या! शिक्षिकांच्या जाचाला कंटाळून मेट्रो स्टेशनवरून घेतली उडी

Delhi Marathi Student Suicide News : 'स्कूलवालोंने इतना बोला की, मुझे यह करना पडा'; 10 वीतील शौर्य पाटीलच्या सुसाईड नोटमधून धक्कादायक खुलासा

ANI :- दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेत 10 वी मध्ये शिकणाऱ्या मूळच्या सांगलीच्या एका मराठी विद्यार्थ्याने शिक्षिकांच्या मानसिक छळाला कंटाळून मेट्रो स्टेशनवरून उडी मारून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शौर्य प्रदीप पाटील (रा. राजीवनगर, नवी दिल्ली) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव असून तो सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वरचा रहिवासी होता. Delhi Student Suicide News

शौर्य पाटील हा दिल्लीतील सेंट कोलंबस विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. मंगळवार, 18 नोव्हेंबर रोजी त्याने राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरून खाली रस्त्यावर उडी मारून आत्महत्या केली. पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दिल्ली पोलिसांनी शौर्य पाटील याच्या स्कूल बॅगमध्ये एक दीड पानाची सुसाइड नोट जप्त केली आहे. या चिठ्ठीत त्याने आत्महत्येमागे शाळेतील शिक्षिकांचा छळ कारणीभूत असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. "मेरा नाम शौर्य पाटील हैं…स्कूलवालोंने इतना बोला की, मुझे यह करना पडा…सॉरी मम्मी, आपका आखरी बार दिल तोड रहा हूँ…स्कूल की टीचर है ही ऐसी क्या बोलू…" असे भावनिक शब्द त्याने या चिठ्ठीत लिहिले आहेत. तसेच, त्याने आई-वडिलांची माफी मागितली असून, गरजूंना आपले अवयव दान करण्याची इच्छाही व्यक्त केली आहे.

सुसाइड नोट आणि वडिलांच्या तक्रारीवरून राजा गार्डन मेट्रो पोलिसांनी सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्या अपराजिता पाल आणि शिक्षिका मनू कालरा, युक्ती महाजन आणि ज्युली व्हर्गिस यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आज शौर्यवर त्यांच्या मूळ गावी, ढवळेश्वर (ता. खानापूर, जि. सांगली) येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

शेअर करा