मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Delhi RDC Parade : दिल्ली येथे होणाऱ्या परेडसाठी वैभवी शेंडगे हिची निवड

प्रतिनिधी चंद्रशेखर केंगार :- श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथील एनसीसी विभागातील कॅडेट वैभवी गोपाळ शेंडगे हिची दिल्ली येथे होणाऱ्या 26 जानेवारी 2025 प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या RDC संचलन परेडसाठी दिल्ली येथील राजपथावर होणाऱ्या पंतप्रधान रॅलीसाठी ड्रिल मधुन तिची महाराष्ट्राच्या मुलीच्या संघात

V
Vivek

1 मिनिट वाचन

Delhi RDC Parade : दिल्ली येथे होणाऱ्या परेडसाठी वैभवी शेंडगे हिची निवड

प्रतिनिधी चंद्रशेखर केंगार :- श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथील एनसीसी विभागातील कॅडेट वैभवी गोपाळ शेंडगे हिची दिल्ली येथे होणाऱ्या 26 जानेवारी 2025 प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या RDC संचलन परेडसाठी दिल्ली येथील राजपथावर होणाऱ्या पंतप्रधान रॅलीसाठी ड्रिल मधुन तिची महाराष्ट्राच्या मुलीच्या संघात निवड झाली आहे .प्रत्येक वर्षी होणाऱ्या या संचलनासाठी देशातुन सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशातुन एनसीसी कॅडेटस ड्रिल परेड इतर सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतात . या साठी अनेक कठिन चाचण्या, परीक्षा पूर्ण करून ते कॅडेटस इथपर्यंत पोहचतात प्रत्येक कॅडेटसचे एनसीसी मध्ये प्रवेश घेतल्या नंतर सर्वात मोठे उदिष्ठ , स्वप्न याच शिबीराचे असते रात्र -दिवस एक करून हे कॅडेटस याची तयारी करत असतात.

छायाचित्रे · 1/2

Arrow Keys ⟵ ⟶

हे शिबीर कॅडेटसचे भवितव्य ठरवणारे असते. मौजे कोरेगाववाडी ता . उमरगा जि . धाराशिव येथील छोट्याशा खेडगावातुन कठिन अशा परिस्थितीताला सामोरे जाऊन एका गरीब शेतकऱ्याची मुलीने स्वतःच्या जिद्द ,आत्मविश्वास , कठोर परिश्रम घेऊन हे यश वैभवी शेंडगे या मुलीने पूर्ण करून दाखविले आहे हिचे कौतुक संपुर्ण धाराशिव जिल्हा,उमरगा तालुक्यातुन होत आहे . वैभवीला 53 महाराष्ट्र एनसीसी बरालिएन लातूरचे कमान अधिकारी कर्नल वाय बी सिंग त्यांच्या सर्व सैन्यदलातील संघ व कॅप्टन डॉ ज्ञानेश्वर चिट्टमपल्ले यांनी मार्गदर्शन केले . या यशा बदल भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा .अमोल भैया मोरे उपाध्यक्ष अश्लेष भैया मोरे , सर्व संस्थेचे संचालक मंडळातील सदस्यानी तिचे कौतुक व अभिनंदन केले . तसेच शिबीरात सहभागी झाल्या बदल प्राचार्य डॉ संजय अस्वले,उप्राचार्य डॉ विलास इंगळे , डॉ पदमाकर पिटले , प्रा गुंडाबापु मोरे , शैलेश महामुनी , श्री नितीन कोराळे , राजकुमार सोनवणे सर्व प्राध्यापक , प्राध्यापिका कॅडेटस , विद्यार्थी , कर्मचारी यांच्या वतीने यशिस्वेतेसाठी शुभेच्छा दिल्या .

हेही वाचा: Chandrashekhar Bawankule : 'उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला', चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं वक्तव्य, शिवसेना-ठाकरे गटाचे प्रमुखांना 'बुद्धिहीन नेता' म्हटलं

शेअर करा