मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Delhi News : दिल्लीतील बलात्कारप्रकरणी राहुल गांधी संतप्त

Delhi News : दिल्ली - दिल्ली-एनसीआरमध्ये धावत्या बसमधील चालक आणि वाहकाने एका सोळा वर्षीय मुलीवर अत्याचार केला.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

दिल्लीतील बलात्कारप्रकरणी राहुल गांधी संतप्त पोस्टद्वारे व्यक्त केला संताप
दिल्लीतील बलात्कारप्रकरणी राहुल गांधी संतप्त पोस्टद्वारे व्यक्त केला संताप

Delhi News : पोस्टद्वारे व्यक्त केला संताप


Delhi News : दिल्ली - दिल्ली-एनसीआरमध्ये धावत्या बसमधील चालक आणि वाहकाने एका सोळा वर्षीय मुलीवर अत्याचार केला. या अत्याचार प्रकरणावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “संपूर्ण दिल्ली किंवा नोएडा पोलिसांना याची साधी कल्पनाही नव्हती. राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधणारी एक पोस्ट शेअर केली. त्यांनी लिहिले, “दिल्ली एनसीआर महिलांसाठी इतके असुरक्षित झाले आहे की, ग्रेटर नोएडा ते दिल्ली या ४७ किलोमीटरच्या स्लीपर बसमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. हे धक्कादायक आहे की संपूर्ण दिल्ली किंवा नोएडा पोलिसांना याची माहितीच नव्हती. ही बस नोएडा-ग्रेटर नोएडा द्रुतगती मार्ग, दिल्ली रिंग रोड आणि सीमा ओलांडून गेली आणि तिला एकाही तपासणी नाक्यावर थांबवण्यात आले नाहीhttps://maharashtramirror.com/ Delhi News


नियमांचे पालन का केले जात नाही?
राहुल गांधी म्हणाले, “बसच्या सीटवर पडदे लावलेले होते, जेणेकरून आत काय चालले आहे हे कोणालाही दिसू नये आणि गुन्हेगारांना प्रशासनाची भीती वाटत नाही. निर्भयाच्या घटनेला इतकी वर्षे उलटून गेली असताना, इतक्या घटनांनंतरही, अशा बसेसची तपासणी आणि देखरेख करण्याचे नियम का पाळले जात नाहीत?” त्या बसवर फक्त पडदेच लावण्यात आले नव्हते, सरकारने वर्षानुवर्षे प्रशासकीय अपयशांवर पांघरूण घातल्यामुळे, देशाच्या राजधानीतही महिला सुरक्षितपणे प्रवास करू शकत नाहीत. https://maharashtramirror.com/ Delhi News
केंद्र आणि राज्य सरकारे या परिस्थितीकडे लक्ष देण्यापूर्वी आणखी किती महिला आणि मुलींना या दुर्दशेला सामोरे जावे लागेल? अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली पोलीस आणि आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील यूपी पोलिसांना जबाबदार धरले जाईल का? अजिबात शक्यता नाही – हा गुन्हा दडपला जाईल.https://maharashtramirror.com/ Delhi News


आरोपींना अटक करण्यात आली
ही घटना ४ ऑगस्टच्या रात्री, ४७ किलोमीटरच्या बस प्रवासादरम्यान घडली. बस ग्रेटर नोएडातील परी चौक ते जुन्या दिल्लीतील काश्मिरी गेट असा प्रवास करत होती. पोलिसांनी चालक आणि वाहक दोघांनाही अटक केली आहे. बसदेखील जप्त करून न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे.

शेअर करा