मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Delhi News : दिल्लीत इंडिया आघाडीच्या आंदोलनाला हिंसक वळण; राहुल गांधी अन् प्रियंका गांधींविरोधात एफआयआर दाखल!'

Delhi News : नवी दिल्ली :- केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कथित घोटाळ्याविरोधात दिल्लीत 'इंडिया' (INDIA) आघाडीने पुकारलेल्या भव्य आंदोलनानंतर आता काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

दिल्लीत इंडिया आघाडीच्या आंदोलनाला हिंसक वळण; राहुल गांधी अन् प्रियंका गांधींविरोधात एफआयआर दाखल!'
दिल्लीत इंडिया आघाडीच्या आंदोलनाला हिंसक वळण; राहुल गांधी अन् प्रियंका गांधींविरोधात एफआयआर दाखल!'

Delhi News : आकाशवाणी भवनात जबरदस्तीने घुसखोरी केल्याप्रकरणी पोलिसांचे मोठे पाऊल; दिल्लीतील राजकीय वातावरण प्रचंड तापले

Delhi News : नवी दिल्ली :- केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कथित घोटाळ्याविरोधात दिल्लीत 'इंडिया' (INDIA) आघाडीने पुकारलेल्या भव्य आंदोलनानंतर आता काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. काल दिवसभर चालेल्या हाय-व्होल्टेज आंदोलनादरम्यान पोलीस प्रशासनाचे आदेश डावलून आकाशवाणी भवनात जबरदस्तीने घुसखोरी केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांच्याविरोधात थेट एफआयआर (FIR ) दाखल केला आहे.या पोलीस कारवाईमुळे काँग्रेससह संपूर्ण विरोधी पक्षात प्रचंड संतापाची लाट उसळली असून राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.https://maharashtramirror.com/ Delhi News

'पोलिसांचा अटकाव झुगारून आकाशवाणी भवनात केला प्रवेश'

मिळालेल्या माहितीनुसार, काल संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे तब्बल 140 खासदारांसह निघालेला इंडिया आघाडीचा मार्च आकाशवाणी भवनापासून 400 मीटर अंतरावर पोलिसांनी भक्कम बॅरिकेड्स लावून रोखला होता. मोर्चा रोखल्यानंतर राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केले.https://maharashtramirror.com/ Delhi News

दिवसभर चाललेल्या या आंदोलनादरम्यान पोलिसांनी संध्याकाळी आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले होते. मात्र, सुटका होताच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पुन्हा आक्रमक होत आकाशवाणी भवनाच्या दिशेने कूच केली. पोलिसांचा कडक बंदोबस्त आणि अटकाव झुगारून या दोन्ही नेत्यांनी समर्थकांसह जबरदस्तीने आकाशवाणी भवनाच्या आवारात प्रवेश केला. या बेकायदेशीर घुसखोरीची गंभीर दखल घेत दिल्ली पोलिसांनी दोन्ही नेत्यांवर विविध कलमांन्वये गुन्हे नोंदवले आहेत.

'संसद ते निवडणूक आयोगापर्यंत छावणीचे रूप; बॅरिकेड्स अन् मोठा पोलीस ताफा'

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची आणि आगामी सर्व निवडणुका 'बॅलेट पेपर'वर घेण्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांनी निवडणूक आयोगाच्या (Nirvachan Sadan) मुख्य कार्यालयात घुसू नये, यासाठी दिल्ली पोलिसांनी संपूर्ण परिसराला छावणीचे रूप दिले होते. प्रत्येक मुख्य रस्त्यावर भक्कम बॅरिकेड्स, रॅपिड ॲक्शन फोर्स (RAF) आणि पॅरामिलिट्री दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या.

मात्र, एवढा कडक बंदोबस्त असतानाही राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी थेट आकाशवाणी भवनात प्रवेश केल्याने दिल्ली पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. एफआयआर दाखल झाल्यानंतर आता या प्रकरणात पुढे काय कारवाई होते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

  • ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/
  • शेअर करा