मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Dehradun News : चमोलीत 24 तासांत 7 फूट बर्फाखाली 47 मजुरांची कशी सुटका?

Dehradun News : उत्तराखंडमधील चमोली येथे प्रचंड हिमस्खलन झाले.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Dehradun News : चमोलीत 24 तासांत 7 फूट बर्फाखाली 47 मजुरांची कशी सुटका?

Dehradun News : उत्तराखंडमधील चमोली येथे प्रचंड हिमस्खलन झाले. ज्यामध्ये महामार्ग बांधणीच्या कामात गुंतलेले 57 मजूर गाडले गेले. या दुर्घटनेनंतर मोठ्या प्रमाणावर बचावकार्य राबविण्यात आले.

ANI :- अपघातानंतर प्रशासनाकडून तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. 24 तासांच्या बचाव मोहिमेत 47 मजुरांना वाचवण्यात यश आले असून 8 जणांचा शोध सुरू आहे.अपघातानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले. सुरुवातीला बीआरओ आणि आयटीबीपीच्या जवानांनी लोकांना वाचवले.

शनिवारी सकाळी चमोलीत हवामान स्वच्छ झाल्यानंतर मदतकार्याला वेग आला आहे. आयटीबीपी, एसडीआरएफच्या पथकांनी मजुरांचा शोध सुरू केला.शुक्रवारी खराब हवामानामुळे बचावकार्यात अनेक अडचणी आल्या.सतत बर्फवृष्टी आणि खराब हवामानामुळे बचाव पथकांना घटनास्थळी पोहोचण्यात अडचणी येत होत्या.

बचाव पथक दोरीच्या साहाय्याने 7-7 फूट बर्फाखाली कसे तरी घटनास्थळी पोहोचले आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले.मुसळधार बर्फवृष्टीमुळे कामगारांना या भागात पोहोचण्यात खूप अडचणी आल्या.

या अपघातात 2-3 जणांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.कामगारांना बाहेर काढल्यानंतर त्यांना तातडीने हेलिकॉप्टरने आणण्यात आलेपीएम मोदींनी सीएम पुष्कर सिंह धामी यांच्याशी फोनवर बोलून संपूर्ण बचाव कार्याची माहिती घेतली.

शेअर करा