मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Dadar Train Suicide News : एक्सप्रेस ट्रेनमध्ये तरुणाची आत्महत्या, बाथरूममध्ये मृतदेह आढळल्याने घबराट

Dadar Railway Station Ranakpur Train Suicide News : दादर रेल्वे टर्मिनल येथे रणकपूर एक्सप्रेस ट्रेनच्या बाथरूममध्ये एका व्यक्तीने आत्महत्या केली.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Dadar Train Suicide News : एक्सप्रेस ट्रेनमध्ये तरुणाची आत्महत्या, बाथरूममध्ये मृतदेह आढळल्याने घबराट

Dadar Railway Station Ranakpur Train Suicide News : दादर रेल्वे टर्मिनल येथे रणकपूर एक्सप्रेस ट्रेनच्या बाथरूममध्ये एका व्यक्तीने आत्महत्या केली. रेल्वे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद

मुंबई :- दादर रेल्वे टर्मिनल येथे बुधवारी सकाळी एका व्यक्तीने रणकपूर एक्स्प्रेस ट्रेनमध्ये आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. दादर टर्मिनलवर आल्यानंतर आरपीएफ ट्रेनची तपासणी करत असताना ही बाब उघडकीस आली.आरपीएफने आतील व्यक्तीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु बाथरूममध्ये उपस्थित असलेल्या व्यक्तीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

शेवटी आरपीएफ आणि पोलिसांनी बाथरूमचा दरवाजा उघडला. यानंतर टॉयलेटमध्ये एक व्यक्ती टॉवेलला लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. आश्चर्याची बाब म्हणजे आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या कपड्यांमध्ये कोणतेही ओळखपत्र किंवा मोबाईल फोन सापडला नाही.या प्रकरणी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रेल्वे पोलीस सध्या मृतांची ओळख आणि त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेत आहे.

शेअर करा