मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Cricket News : शुभमन गिलवर भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी; इंग्लंड दौऱ्यासाठी संघ जाहीर

20 जूनपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी गिलला कर्णधारपदाची संधी,पंत उपकर्णधार, नव्या चेहऱ्यांना मोठी संधी

V
Vivek

1 मिनिट वाचन

Cricket News : शुभमन गिलवर भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी; इंग्लंड दौऱ्यासाठी संघ जाहीर

20 जूनपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी गिलला कर्णधारपदाची संधी,पंत उपकर्णधार, नव्या चेहऱ्यांना मोठी संधी

BCCI :- भारताचा इंग्लंड दौरा अधिकृतपणे जाहीर झाला असून, बीसीसीआयने (BCCI) कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. यावेळी सर्वांची नजर लागलेली होती कर्णधारपदावर, आणि अपेक्षेप्रमाणे युवा स्टार शुभमन गिलला संघाचं नेतृत्व देण्यात आलं आहे. ही पाच कसोटी सामन्यांची मालिका 20 जूनपासून लीड्समध्ये सुरू होणार आहे.

गिलसोबतच ऋषभ पंतला उपकर्णधाराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संघात अनेक नवोदित आणि अनुभवी चेहऱ्यांचा समावेश असून, भारताला इंग्लंडमध्ये विजयी कामगिरी करण्यासाठी नवे फॉर्म्युला आजमावण्याची संधी मिळणार आहे.

इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ:

  • शुभमन गिल (कर्णधार)
  • ऋषभ पंत (उपकर्णधार)
  • यशस्वी जायसवाल
  • के.एल. राहुल
  • साई सुदर्शन
  • अभिमन्यु ईश्वरन
  • करुण नायर
  • नितीश कुमार रेड्डी
  • रवींद्र जडेजा
  • ध्रुव जुरेल
  • वाशिंगटन सुंदर
  • शार्दुल ठाकुर
  • जसप्रीत बुमराह
  • मोहम्मद सिराज
  • प्रसिद्ध कृष्णा
  • आकाशदीप
  • अर्शदीप सिंह
  • कुलदीप यादव
  • कसोटी मालिकेचा कार्यक्रम:

    • पहिला सामना: 20 ते 24 जून - लीड्स
    • दुसरा सामना: 2 ते 6 जुलै - बर्मिंघम
    • तिसरा सामना: 10 ते 14 जुलै - लॉर्ड्स
    • चौथा सामना: 23 ते 27 जुलै - मँचेस्टर
    • पाचवा सामना: 31 जुलै ते 4 ऑगस्ट - ओव्हल, लंडन
    • गिलसाठी ही एक मोठी संधी असून, त्याच्या नेतृत्वात भारत इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे.

      हेही वाचा: Sanjay Raut : महाराष्ट्र आर्थिक संकटात: ‘लाडकी बहिण’ योजनेला निधी नाही – संजय राऊत यांचा आरोप

      शेअर करा