मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

प्रार्थनेद्वारे आजार बरे करण्याचा दावा करणाऱ्या पास्टरविरुद्ध पिंपरी चिंचवडमध्ये तक्रार

चर्चमध्ये येऊन आरडाओरड आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल फिर्यादी व अन्य लोकांविरुद्धही तक्रार

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

प्रार्थनेद्वारे आजार बरे करण्याचा दावा करणाऱ्या पास्टरविरुद्ध पिंपरी चिंचवडमध्ये तक्रार

चर्चमध्ये येऊन आरडाओरड आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल फिर्यादी व अन्य लोकांविरुद्धही तक्रार

पिंपरी : पिंपरी चिंचवड काळेवाडी येथील एका चर्चमध्ये विनापरवाना लोकांना जमवून, प्रार्थनेद्वारे असाध्य आजार बरे करण्याचा दावा करत अंधश्रद्धा पसरवणाऱ्या पास्टरवर काळेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी फिर्यादीला मारहाण केल्याप्रकरणी पास्टरसह इतर ७ ते ८ अनोळखी इसमांविरुद्ध गुन्‍ह्याची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काळेवाडीतील परमवीर कॉलनी येथील 'जीजस इस लॉर्ड चर्च'मध्ये रविवारी (ता. २६ ) सकाळी ११:३० ते दुपारी २:३० च्या दरम्यान ही घटना घडली. पास्टर केनेथ सिल्वे हा कोणत्याही परवानगीशिवाय लोकांना बेकायदेशीररित्या जमा करून त्यांची प्रार्थना घेत होता. यावेळी तो प्रार्थनेद्वारे लोकांचे गंभीर आजार बरे करतो, असा दावा करून समाजात अंधश्रद्धा पसरवत असल्याचे समोर आले.

यावेळी फिर्यादी सिद्धांत शाहूराज चव्हाण (वय ३५, रा. भोसरी) यांनी आपल्या आपल्या मोबाईलमध्ये हे चित्रीकरण करत असताना ते पाहून चिडलेल्या पास्टर केनेथ सिल्वे याने तिथल्या ७ ते ८ अनुयायांना फिर्यादीला मारहाण करण्यासाठी चिथावणी दिली. आरोपींनी चव्हाण यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच, त्यांना वाचवण्यासाठी आलेले प्रतीक विलास खराडे आणि वैभव संतोष सावंत यांनाही आरोपींनी मारहाण केली.

या प्रकरणी सिद्धांत चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून काळेवाडी पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास काळेवाडी पोलीस करत आहेत.

तर दुसरीकडे , धार्मिक प्रार्थना सुरू असताना चर्चमध्ये येऊन आरडाओरड आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल निकसन थॉमस यांनीही फिर्यादी सिद्धांत शाहूराज चव्हाण यांच्यासह अन्य तिघांविरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्याविरोधात काळेवाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Complaint filed in Pimpri Chinchwad against pastor who claims to cure diseases through prayer

शेअर करा