मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Chiplun Breaking News :चिपळूणमध्ये ठाकरे गटाला मोठा सुरुंग!

Thackeray ChiPun Leader Samir Takle Latest News : निष्ठावंत समीर टाकळे यांचा 'जय महाराष्ट्र'; दशकांचे ऋणानुबंध संपले

V
Vivek

1 मिनिट वाचन

Chiplun Breaking News :चिपळूणमध्ये ठाकरे गटाला मोठा सुरुंग!

Thackeray ChiPun Leader Samir Takle Latest News : निष्ठावंत समीर टाकळे यांचा 'जय महाराष्ट्र'; दशकांचे ऋणानुबंध संपले

चिपळूण | रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या चिपळूणमध्ये ठाकरे गटाला जबरदस्त धक्का बसला आहे. पक्षाचे माजी उपशहरप्रमुख आणि चिपळूण अर्बन बँकेचे संचालक समीर टाकळे यांनी शिवसेना (UBT) पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. टाकळे कुटुंबाचा शिवसेनेशी असलेला दशकांचा संबंध आता अधिकृतपणे संपुष्टात आला आहे.

निष्ठावंत घराण्याने सोडली साथ

समीर टाकळे हे केवळ एक नेते नसून, चिपळूणमध्ये शिवसेना उभी करणाऱ्या टाकळे कुटुंबाचे वारसदार आहेत. शिवसेनेचे पहिले जिल्हाप्रमुख बंधू टाकळे यांचे हे कुटुंब असून, त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत प्रत्यक्ष काम केले आहे. शिवसेनेच्या फुटीनंतरही त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नव्हती, मात्र आता त्यांनी घेतलेला हा निर्णय राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

टाकळे कुटुंबाचा सामूहिक राजीनामा

गेल्या काही दिवसांपासून टाकळे कुटुंबात नाराजीचे वारे वाहत होते. काही दिवसांपूर्वीच समीर टाकळे यांच्या कन्या आणि युवती शहर संघटक डॉ. सानिका टाकळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासूनच समीर टाकळे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर आज त्यांनी यावर शिक्कामोर्तब करत शिवसेनेशी आपला संबंध राहणार नसल्याचे स्पष्ट केले.

ठाकरे गटासाठी चिंतेची बाब

महानगरपालिका निवडणुकांचे निकाल हाती येत असताना, ग्रामीण भागात आणि विशेषतः कोकणासारख्या बालेकिल्ल्यात अशा प्रकारे प्रभावी नेत्यांनी साथ सोडणे ठाकरे गटासाठी नुकसानकारक ठरू शकते. समीर टाकळे यांच्या राजीनाम्यामुळे चिपळूण शहरातील ठाकरे गटाची संघटनात्मक बांधणी कमकुवत होण्याची भीती व्यक्त होत आहे.

शेअर करा