Pimpri Crime : चिंचवड येथे तरुणाला १६ लाखांचा गंडा ; शेअर मार्केट ॲपमध्ये गुंतवणुकीचा बहाणा
Pimpri Crime : पिंपरी: शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून दुप्पट नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका तरुणाची फसवणूक करण्यात आली.
1 मिनिट वाचन

Pimpri Crime : पिंपरी: शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून दुप्पट नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका तरुणाची फसवणूक करण्यात आली. ही घटना २ ऑगस्ट २०२३ ते २७ मे २०२४ दरम्यान बिजलीनगर, चिंचवड येथे घडली. याबाबत केतन रामकृष्ण पाटील (२४, बिजलीनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विशाल चंदु पाटील, गौरव चंदु पाटील आणि एका महिला आरोपीच्या (सर्व रा. शिरपूर, जि. धुळे) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pimpri News
आरोपींनी फिर्यादीला 'गुर ट्रेड ७' नावाच्या ॲपद्वारे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यास सांगितले. सुरुवातीला तोटा झाल्याचे सांगून नंतर जास्त पैसे गुंतवल्यास दुप्पट परतावा मिळेल असे आमिष दाखवले. त्यानंतर नफ्याचे पैसे काढण्यासाठी विविध कारणे देऊन फिर्यादीकडून १६ लाख ४२ हजार ५०० रुपये ऑनलाईन उकळले व ते पैसे स्वतःसाठी वापरून फसवणूक केली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.




