Pune News : चिखलीतील सराईत आरोपीवर एमपीडीएअंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई
Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिखली येथील अंबादास तायप्पा पवार (वय ३८) याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली.
1 मिनिट वाचन

Pune News :वालचंदनगर पोलिसांची कारवाई
Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिखली येथील अंबादास तायप्पा पवार (वय ३८) याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली. पुणे जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलिसांनी त्याला १५ ऑक्टोबर रोजी ताब्यात घेऊन नागपूर मध्यवर्ती कारागृहात दाखल केले.https://maharashtramirror.com/ Pune News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार याच्याविरुद्ध २०११, २०१४, २०१६, २०२४ आणि २०२६ या वर्षांत एकूण दहा गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये दरोडा, दरोड्याची पूर्वतयारी, जबरी चोरी, खंडणी, बेकायदा अग्निशस्त्र बाळगणे, खुनाचा प्रयत्न, लोकसेवकावर हल्ला आणि मालमत्तेचे नुकसान करणे अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी सराईत व धोकादायक व्यक्तींविरुद्ध एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाईचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वालचंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी अंबादास पवार याच्या स्थानबद्धतेचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे सादर केला. प्रस्तावाची छाननी करून तो पुढील कार्यवाहीसाठी पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला.
सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी जिल्हादंडाधिकाऱ्यांनी १३ ऑक्टोबर रोजी स्थानबद्धतेचा आदेश दिला. त्यानंतर पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी अधिकारी व अंमलदारांची स्वतंत्र पथके तयार केली. या पथकांनी शोध घेऊन पवार याला ताब्यात घेतले आणि नागपूर मध्यवर्ती कारागृहात दाखल केले.
पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, वालचंदनगरचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार गुणगे तसेच स्थानिक गुन्हे शाखा आणि वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व अंमलदारांनी कारवाईत सहभाग घेतला.




