मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Devendra Fadnavis : इचलकरंजीत 700 कोटींहून अधिक विकास कामांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

पायाभूत सुविधांपासून आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते व सामाजिक योजनांचा समावेश,इचलकरंजीचा विकास हे आमचे प्राधान्य" – मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही

V
Vivek

1 मिनिट वाचन

Devendra Fadnavis : इचलकरंजीत 700 कोटींहून अधिक विकास कामांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

पायाभूत सुविधांपासून आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते व सामाजिक योजनांचा समावेश,इचलकरंजीचा विकास हे आमचे प्राधान्य" – मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही

इचलकरंजी‌ :- इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचे भूमिपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. एकूण 700 कोटींहून अधिक निधीच्या योजनांचा समावेश असलेल्या या कार्यक्रमात पायाभूत सुविधांपासून आरोग्य व सामाजिक कल्याण योजनांपर्यंत विविध उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला.

UIDSSMT योजनेअंतर्गत कबनूर व शहापूर परिसरासाठी भुयार गटार योजना व मलशुद्धीकरण केंद्रासाठी
130.60 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. तसेच नगरोत्थान अभियानाअंतर्गत 488.67 कोटी खर्चून गटार योजनेचे बळकटीकरण व विस्तार होणार आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानाअंतर्गत शहरात पाणीपुरवठा सुसज्ज करण्यासाठी 31.37 कोटींच्या कामांचा प्रारंभ करण्यात आला.

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 10 रस्त्यांचे भूमिपूजन 59 कोटींच्या निधीतून झाले. नव्याने बांधण्यात आलेल्या शहापूर पोलीस ठाण्याचे उद्घाटन 4 कोटींच्या खर्चातून करण्यात आले. सामाजिक योजनांच्या अनुषंगाने संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजना अंतर्गत 4200 लाभार्थ्यांना मंजुरीपत्रे वितरित करण्यात आली, तर 5000 बांधकाम कामगारांना भांडे व साहित्याचे वाटप करण्यात आले.

याशिवाय इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय येथे नव्याने मंजूर नर्सिंग कॉलेजचेही उद्घाटन यावेळी करण्यात आले.
"इचलकरंजीचा सर्वांगीण विकास हे आमच्या सरकारचे प्राधान्य असून, नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवण्यासाठी या योजना महत्त्वपूर्ण ठरतील," असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा: "अजानवरील लाऊडस्पीकरबाबत मुस्लीम समाजाची भावना लक्षात घ्यावी" – आमदार अबू आझमींची मुख्यमंत्री फडणवीस यांना मागणी

शेअर करा