मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Chandrashekhar Bawankule : खासदार संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडले ; भाजपा प्रदेशाध्यक्ष मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule On Sanjay Raut : 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकारणात निवृत्ती घेणार संजय राऊत यांचा दावा

V
Vivek

2 मिनिट वाचन

Chandrashekhar Bawankule

Chandrashekhar Bawankule On Sanjay Raut : 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकारणात निवृत्ती घेणार संजय राऊत यांचा दावा

मुंबई :- शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Modi यांच्या निवृत्ती घेणार असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर भाजपाकडून संजय राऊत यांना निशाणा करण्यात आला आहे. Chandrashekhar Bawankule On Sanjay Raut भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करत म्हणाले की संजयराव त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्यामुळे त्यांना भाजप द्वेषाची कावीळ झाली असल्याचे टीका बावनकुळे यांनी केली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी निवृत्ती होणार हे देश ठरवले सकाळचा भोंगा नाही अशी खोचक टीका बावनकुळे यांनी केली आहे.

या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर पलटवार केला आहे. बावनकुळे यांनी एका पोस्टच्या माध्यमातून संजय राऊत यांचा दावा खोडून काढला आहे. त्यासाठी त्यांनी अटल बिहारी वाजपेयी, मोरारजी देसाई आणि मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळाचा देखील दाखला दिला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे विधान ही केवळ राजकीय स्टंटबाजी आहे. 75 वर्षे वयानंतर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी राजकारण सोडावे, असा कोणताही नियम नाही किंवा असा कुठलाही निर्णय झालेला नाही. भाजपच्या कोणत्याही अधिकृत धोरणातही असे म्हटलेले नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीवर बोलताना संजय राऊत म्हणाले होते की, 'स्वतः नरेंद्र मोदी यांनी एक नियम केला आहे. तो नियम त्यांना लागू होत नाही का? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. त्यांच्या पक्षात 75 वर्ष झाल्यानंतर सत्तेच्या पदावर कोणीही राहू नये, हा त्यांचाच नियम आहे. हा नियम लालकृष्ण अडवाणी, आणि मुरली मनोहर जोशी यांच्यासह अनेक नेत्यांना लागू केला गेला. या नियमाच्या पलीकडे नरेंद्र मोदी आहेत का? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील या नियमाला मान्यता दिली होती. त्यामुळे यावर चर्चा करण्यासाठीच नरेंद्र मोदी संघाच्या मुख्यालयात गेले होते. आगामी 17 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी 75 वर्षे पूर्ण करत आहेत. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीवर चर्चा करण्यासाठीच ते संघाच्या मुख्यालयात गेले, असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.'

शेअर करा