मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Chadrakant Patil : राज ठाकरे म्हणजे राजकीय वादळ! – चंद्रकांत पाटील यांचा सूचक इशारा

Chandrakant Patil On Raj Thackeray : फडणवीस-राज ठाकरे भेटीमुळे चर्चांना उधाण; मनसेच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

V
Vivek

1 मिनिट वाचन

Chadrakant Patil : राज ठाकरे म्हणजे राजकीय वादळ! – चंद्रकांत पाटील यांचा सूचक इशारा

Chandrakant Patil On Raj Thackeray : फडणवीस-राज ठाकरे भेटीमुळे चर्चांना उधाण; मनसेच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

सांगली | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांच्या आगामी राजकीय भूमिकेवर प्रचंड सस्पेंस निर्माण झाला आहे. नुकतीच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गुप्त भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात उलथापालथ झाली आहे. यावर भाष्य करताना भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सूचक विधान केलं आहे की, "राज ठाकरे हे वादळासारखे आहेत, त्यांचा मार्ग कधी आणि कुठे वळेल, हे कोणीही सांगू शकत नाही."

राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासोबत संभाव्य युतीचे संकेत दिले होते, ज्याचे स्वागत स्वतः उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. मात्र फडणवीस यांच्याशी झालेली अचानक भेट आणि त्यानंतर निर्माण झालेल्या चर्चा यामुळे मनसेच्या राजकीय धोरणाबाबत पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनीही राज ठाकरे – फडणवीस भेटीवर टीका करताना म्हटलं की, "ही भेट म्हणजे फक्त वातावरण निर्मिती आहे. मात्र मुंबई व मराठी माणसाच्या हलाखीची जबाबदारी भाजप व फडणवीस यांच्यावर आहे."

एकेकाळी पंतप्रधान मोदी यांचे खुले समर्थन करणारे राज ठाकरे यांनी 2024 लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा दिला होता. मात्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी मनसेने आपले स्वतंत्र उमेदवार उभे केले होते. आता आगामी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राज ठाकरे यांचा पुढील राजकीय डाव काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे

शेअर करा