मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Latur NCP Rada Suraj Chavan : पत्ते उधळले, राजकारण बिघडले! लातूरमधील राड्यानंतर सूरज चव्हाण अडचणीत

‘छावा’ कार्यकर्त्यांवर बेदम मारहाण; राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्षांविरुद्ध गुन्हा दाखल

V
Vivek

1 मिनिट वाचन

Latur NCP Rada Suraj Chavan : पत्ते उधळले, राजकारण बिघडले! लातूरमधील राड्यानंतर सूरज चव्हाण अडचणीत

  • ‘छावा’ कार्यकर्त्यांवर बेदम मारहाण; राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्षांविरुद्ध गुन्हा दाखल
  • मुंबई :- कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या रम्मी व्हिडीओवरून सुरु झालेलं वादाचं चक्र आता थेट मारहाणीपर्यंत पोहोचलं आहे. लातूरमध्ये ‘अखिल भारतीय छावा संघटने’च्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर पत्ते उधळून निषेध नोंदवला. मात्र, या निषेधाला वळण लागलं हाणामारीचं!

    या घटनेदरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी ‘छावा’ कार्यकर्त्यांना सार्वजनिक ठिकाणी बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे महा युती सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकेची झोड उठली असून विरोधकांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.

    या मारहाणीप्रकरणी सूरज चव्हाणसह 10 जणांवर लातूरमधील विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या दोन वेगवेगळ्या टीम्स सध्या सूरज चव्हाण यांच्या शोधात आहेत.

    उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले?

    काल लातूरमध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर, मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

    पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केले जाणारे वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारले जाणार नाही, यासाठी हा कठोर निर्णय घेतला आहे.

    अजित पवार यांच्याकडून सुरज चव्हाण यांना राजीनामा देण्याच्या सूचना

    काल लातूरमध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर, मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

    पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केले जाणारे वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारले जाणार नाही, यासाठी हा कठोर निर्णय घेतला आहे.

    हेही वाचा: Ambadas Danve : "घाव भरावा, शिवसेना एकत्र यावी!" – अंबादास दानवे यांचे भावनिक आवाहन

    शेअर करा