मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Ambadas Danve : "घाव भरावा, शिवसेना एकत्र यावी!" – अंबादास दानवे यांचे भावनिक आवाहन

•राज-उद्धव मंचावर एकत्र; शिंदे-उद्धव गट एकत्र येणार?

V
Vivek

1 मिनिट वाचन

Ambadas Danve

•राज-उद्धव मंचावर एकत्र; शिंदे-उद्धव गट एकत्र येणार? चर्चा रंगली

मुंबई :- राज्याच्या राजकारणात सध्या एकीकडे महायुतीतील गोंधळ तर दुसरीकडे शिवसेनेतील फुटीच्या जखमा पुन्हा उफाळून येत आहेत. 2022 मधील शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर शिवसेनेची दोन फळी निर्माण झाली. पण आता शिंदे आणि उद्धव ठाकरे गट पुन्हा एकत्र येणार का? यावर चर्चा सुरू झाली आहे.

पावसाळी अधिवेशनादरम्यान विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या सत्कार समारंभात उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच व्यासपीठावर होते. मात्र, दोघांमध्ये साधा नजरेचा संपर्कही झाला नाही. तरीही, शिवसेनेच्या पुन्हा एकत्र येण्याच्या शक्यतेने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

अंबादास दानवे यांनी पक्षातील फुटीवर भाष्य करत ती "शिवसेनेच्या हृदयात खोलवर झालेली जखम" असल्याचं म्हटलं. ते म्हणाले, "आम्ही सत्तेसाठी पैदा झालेलो नाही. सत्ता तर येते आणि जाते. पण संघटनेची एकजूट हीच खऱ्या शिवसेनेची ताकद आहे." त्यांनी सर्व शिवसैनिकांना एकत्र येण्याचे आवाहन करत, "ही जखम आता भरून निघायला हवी," अशी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली.दानवे म्हणाले – "शिवसेना हा केवळ पक्ष नाही, तो एक संस्कार आहे. एक शिवसैनिक म्हणून मला हे दुःख सहन होत नाही. शिवसेनेने पुन्हा बळकट व्हावं, हेच माझं स्वप्न आहे."

2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 39 आमदारांनी बंड करून वेगळा गट स्थापन केला आणि भाजपा सोबत सरकार स्थापन केले. यानंतर अजित पवार गटाचेही सरकारात आगमन झाले. हे सगळं घडलं असलं तरी अनेक शिवसैनिकांच्या मनात ती फूट अजूनही कुरतडत आहे.

हेही वाचा: Mumbai Serial Bomb Blast : "11 मिनिटांत मुंबई थरथरली होती, पण 19 वर्षांनी सर्व आरोपी निर्दोष ठरले!"

शेअर करा