मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Canada Firing News : कॅनडात भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या; टोरंटो विद्यापीठातील 20 वर्षीय शिवांक अवस्थीचा करुण अंत

Canada Latest Firing News : विद्यापीठात भीतीचे वातावरण; वैयक्तिक वादातून हत्या झाल्याचा पोलिसांचा संशय

V
Vivek

1 मिनिट वाचन

Canada Firing News : कॅनडात भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या; टोरंटो विद्यापीठातील 20 वर्षीय शिवांक अवस्थीचा करुण अंत

Canada Latest Firing News : विद्यापीठात भीतीचे वातावरण; वैयक्तिक वादातून हत्या झाल्याचा पोलिसांचा संशय

ANI | कॅनडातील टोरंटो विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या शिवांक अवस्थी या 20 वर्षीय भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. 23 डिसेंबर रोजी दुपारी ही धक्कादायक घटना घडली. शिवांकच्या हत्येनंतर टोरंटो विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे सावट पसरले असून, सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

नेमकी घटना काय?

टोरंटो पोलिसांना 23 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजून 34 मिनिटांच्या सुमारास गोळीबाराची माहिती मिळाली होती. पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली, तेव्हा शिवांक अवस्थी हा रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, ही हत्या वैयक्तिक वादातून झाली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे, मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

एक अष्टपैलू विद्यार्थी गमावला

शिवांक अवस्थी हा टोरंटो विद्यापीठात 'लाइफ सायन्स' (Life Science) या विषयाच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत होता. अभ्यासासोबतच तो विद्यापीठाच्या 'चीअरलिडिंग टीम'चा देखील सक्रिय सदस्य होता. त्याच्या मित्रांनी सोशल मीडियावर त्याला श्रद्धांजली वाहिली असून, "एक हसतमुख आणि उत्साही मित्र गमावल्याची" भावना व्यक्त केली आहे.

भारतीय दूतावासाकडून मदतीचे आश्वासन

टोरंटोमधील भारतीय कॉन्सूलेट जनरलच्या अधिकाऱ्यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. दूतावासाचे अधिकारी शिवांकच्या कुटुंबीयांच्या सतत संपर्कात असून, मृतदेह भारतात पाठवण्यासाठी आणि कायदेशीर प्रक्रियेसाठी सर्वतोपरी मदत करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

शेअर करा