मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Buldhana Accident: बुलढाण्यात भीषण अपघात, बोलेरोने बसला धडक, 5 जणांचा मृत्यू

Buldhana Accident: बुलढाणा जिल्ह्यात हृदयद्रावक अपघात झाला.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Buldhana Accident: बुलढाण्यात भीषण अपघात, बोलेरोने बसला धडक, 5 जणांचा मृत्यू

Buldhana Accident: बुलढाणा जिल्ह्यात हृदयद्रावक अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. पहाटे पाच वाजता ही घटना घडली.

बुलढाणा :- बुलढाणा जिल्ह्यात बुधवारी सकाळी भीषण अपघात झाला. Buldhana Accident शेगाव-खामगाव महामार्गावर पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला असून, दोन प्रवासी बस आणि बोलेरो जीप यांच्यात झालेल्या धडकेत पाच जणांना जीव गमवावा लागला, तर 24 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, वेगात असलेल्या बोलेरो जीपने प्रथम प्रवासी बसला धडक दिल्याने हा अपघात झाला. यानंतर लगेचच मागून येणाऱ्या एका खासगी प्रवासी बसने अपघातग्रस्त वाहनांना धडक दिल्याने अपघात अधिक भीषण झाला. या घटनेनंतर महामार्गावर आरडाओरडा आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

स्थानिक पोलीस आणि आपत्कालीन सेवा तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. जखमींना रुग्णवाहिकेद्वारे जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले आणि अपघातस्थळ मोकळे करून वाहतूक पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला.पोलिसांचा अतिवेग आणि निष्काळजीपणा हे अपघाताचे कारण मानले जात आहे. अपघाताची नेमकी कारणे शोधण्यासाठी सध्या या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू आहे. या अपघातामुळे रस्ते सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

शेअर करा