मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Breaking News: Mumbai Police Deploys Massive Force for Election Control

लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालादिवशी तगडा पोलीस बंदोबस्त

V
Vivek

1 मिनिट वाचन

Breaking News: Mumbai Police Deploys Massive Force for Election Control

लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालादिवशी तगडा पोलीस बंदोबस्त

•पोलीस अधिकाऱ्यांचे विशेष जबाबदारी, मतमोजणी केंद्रावर बाहेरील व्यक्तीस प्रवेश बंदी

मुंबई :- केंद्रात कोणाचे सरकार स्थापन होणार इंडिया आघाडी जागा आधी घेणार का एनडीए पुन्हा एकदा सर्कस स्थापन करणार अशी परिस्थिती केंद्रात आणि राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना लागला आहे. मुंबईत ठाकरे विरुद्ध शिंदे आणि भाजप असे सामना रंगला आहे. मुंबईत उद्या हाय व्होल्टेज राजकारण दिसणार आहे राजकीय निकालानंतर अति उत्साह होणार आहे त्यामुळे कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चांगलीच कंबर कसली आहे.

मुंबईत तीन ठिकाणी मतमोजणी केंद्र तैनात केले आहे. मेस्को,विक्रोळी आणि शिवडी येथे मतमोजणी होणार आहे. शहरामध्ये कायदा सुव्यवस्था अबतीत राखण्याकरिता पोलीस आयुक्त मुंबई विशेष पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आयुक्त यांच्या देखरेखीखाली मोठा फौज फाटा मुंबई तैनात करण्यात आला आहे. तसेच तिन्ही मतं केंद्राच्या बाहेर तीनशे मीटर परिसरात दिनांक 2 जून ते 05 जून मध्यरात्रीपर्यंत कर्मचारी तसेच मतमोजणी संदर्भातील राजकीय नेतेमंडळी यांच्या व्यतिरिक्त सर्वसामान्यांना कोणत्याही प्रकारे प्रवेश देण्यास मनाई करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांकडून शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता ठोक पावले उचलण्यात आले आहे.

हेही वाचा: Daund News : ड्रोनच्या भीतीने दौंड तालुका भयभीत ; पोलिस किंवा प्रशासकीय यंञणेकडून खुलासा होणे गरजेचे

शेअर करा