मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Atul Bhatkhalkar On Sharad Pawar : भाजपा आमदार अतुल भातखळकर यांचा शरद पवार यांच्यावर हल्लाबोल

V
Vivek

1 मिनिट वाचन

Atul Bhatkhalkar On Sharad Pawar

2009 निवडणुकीची आठवण करून देत दिला दाखला

मुंबई :- भाजपाचे कांदिवली चे आमदार अतुल भातखळकर Atul Bhatkhalkar यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार Sharad Pawar यांच्यावर हल्लाबोल करत 2009 मध्ये झालेल्या निवडणुकीत शरद पवारांनी जो नारा दिला होता त्याची आठवण करून देत म्हणाले की, गोपीनाथ मुंडेला हरवण्याकरिता बीडमध्ये शरद पवार यांनी "वाजवा तुतारी, हटवा वंजारी.."अशी घोषणा दिली होती.अतुल भातखळकर यांनी एक्सवर ट्विट करत शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. Atul Bhatkhalkar On Sharad Pawar

अतुल भातखळकर यांचे ट्विट

"वाजवा तुतारी…हटवा वंजारी…"ही घोषणा शरद पवारांच्या राष्ट्रवादी कांग्रेसने २००९ च्या निवडणुकीत बीडमध्ये भाजपा नेते गोपिनाथ मुंडे यांना पराभूत करण्यासाठी वापरली होती. तरीही मुंडेसाहेब जिंकले ही गोष्ट वेगळी. पण पवारांचा जातीयवादी चेहरा उघडा पडला होता. तेच जातीचे घाणेरडे राजकारण त्यांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात वापरले. तरीही मीडियाच्या कृपेने त्यांची ओळख पुरोगामी नेते अशीच राहीली. याच महाराष्ट्रद्रोही राजकारणामुळे अखेर त्यांचा बाजार उठला. Atul Bhatkhalkar On Sharad Pawar

शेअर करा