मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

BJP Leaders On Uddhav Thackeray : "आपकी बार भाजप तडीपार", उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या नाऱ्यावर भाजपाकडून कडाडून टीका

•उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्या भारत न्याय जोडो यात्रेदरम्यान भाजपावर कडाडून टीका केली होती त्यानंतर भाजपकडूनही उद्धव ठाकरे यांचा समाचार घेण्यात आला

V
Vivek

2 मिनिट वाचन

BJP Leaders On Uddhav Thackeray

•उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्या भारत न्याय जोडो यात्रेदरम्यान भाजपावर कडाडून टीका केली होती त्यानंतर भाजपकडूनही उद्धव ठाकरे यांचा समाचार घेण्यात आला

मुंबई :- शिवाजी पार्क दादर येथे झालेल्या भारत न्याय जोडो यात्रेचा सांगता जाहीर सभेत करण्यात आला आहे. या सभेत देशातील इंडिया आघाडीचे प्रमुख पक्षातील आठवण अधिक महत्त्वाचे नेते या सभेला उपस्थित होते या सभेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका करत "आपकी बार भाजप तडीपार असा नारा दिला" या राजकीय घडामोडीनंतर भाजपाकडून उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका करण्यात आली आहे. BJP Leaders On Uddhav Thackeray

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले

आयुष्यभर हिंदुत्ववादी भूमिका घेऊन जगणाऱ्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्राला आज जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो म्हणायलाही लाज वाटते. BJP Leaders On Uddhav Thackeray

मतांसाठी आणि सोनिया सेना नाराज होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे किती लाचारी पत्करणार आहेत? बाळासाहेब ठाकरेंचा हिंदुत्ववादी शिवसैनिक आणि स्वाभिमानी महाराष्ट्रातील जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही. BJP Leaders On Uddhav Thackeray

आशिष शेलार यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली

"आपल्याच तोऱ्यात आपली सभा घेऊन… आपल्याला हवे तेवढे… शिवतीर्थावर भाषण करणारे.. श्रीमान उध्दव ठाकरे यांना न्याय सभेत फारच केविलवाणा "न्याय" मिळाला ? भाषणासाठी पाच मिनिटे ठरवून दिली गेली का? भाषणाची सुरुवात “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…!" अशी करण्यास बंदी घालण्यात आली होती का ? स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मारका समोर झालेल्या सभेत सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना दोन खडे बोल "मर्दा"सारखे ऐकवण्यास कोणी मज्जाव केला होता का ? हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राने "हिंदुत्वाला केले तडीपार" हे तमाम महाराष्ट्राला दाखवून देण्यासाठीच "शिवतीर्थावर" सभा घेण्यात आली होती का? सभा एक झालीये.. पण प्रश्न अनेक निर्माण करुन गेली.. अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरेंना खडेबोल सुनावले. एवढंच नव्हे तर, काँग्रेसच्या हातात बाहुल्यासारखी दिली उबाठा गटाची "मशाल", आता खंजीर, वाघ, मर्द.. कोथळा.. अशा काहीही फुशारक्या मारा खुशाल !!", असे खोचक ट्विट केले आहे. BJP Leaders On Uddhav Thackeray

शेअर करा