मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Bhiwandi Crime News : भिवंडीमध्ये मोठ्या प्रमाणावर गुटख्याचा साठा जप्त, हजारो रुपयाचे विमल पान मसाला जप्त

•87 हजार 120 रुपये किमतीचे विमल पान मसाला गुटखा जप्त केल्याची घटना भिवंडी समोर आली आहे

V
Vivek

1 मिनिट वाचन

Bhiwandi Crime News

•87 हजार 120 रुपये किमतीचे विमल पान मसाला गुटखा जप्त केल्याची घटना भिवंडी समोर आली आहे

भिवंडी :- राज्यात लोकसभा निवडणुका चालू आहे. राजकीय मंडळी प्रचारात व्यस्त असून पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीररित्या दारू पैसे अमली पदार्थ गुटखाजन्य पदार्थ यांचे तस्करी खरेदी विक्री करणाऱ्या विरोधात पोलिसांनी कारवाई जा बडगा उभारला आहे. नारपोली पोलिसांनी मोठी कारवाई करत विमल हा गुटखाजन्य पदार्थ पोलिसांनी जप्त केला राज्यात गुटखा प्रतिबंध असतानाही बेकायदेशीर आहे त्या गुटखा बाळगण्याविरुद्ध पोलीस कारवाई करत आहे.

नारपोली पोलीस ठाणे - अन्न सुरक्षा आणि मानके पथकाने काल (03 मे 2024) रोजी मध्यरात्री 01.00 वा. चे सुमारास, नारपोली पोलीस ठाणे चे पथकास मिळालेल्या माहितीवरून, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय कोळी, पोलीस हवालदार पवार व त्यांचे पथकाने, प्रेरणा काॅम्प्लेक्स, डी-3 बिल्डींग, दुसरा मजला, दापोडा, भिवंडी येथे छापा टाकला असता, आरोपी अजय अयोध्याप्रसाद गुप्ता,( 24 वर्षे) (रा.धामणकर नाका, भिवंडी) याने महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला तंबाखुजन्य पदार्थएकुण 87 हजार 120 रूपये किमंतीचा विमल पानमसाला बेकायदेशीररित्या विक्री करत असताना मिळुन आला.प्रकाराबाबत सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादी वरून आरोपींविरूध्द भा.द.वि.कलम 328,273,188,34 सह अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 कलम 26(2)(आय), 3(1)(झेड)(आय), 26(2)(आयव्ही), 30(2)(आय) सह शिक्षा कलम 59(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीस अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कोळी हे करीत आहे.

हेही वाचा: Sanjay Raut On Devendra Fadnavis : शिवसेना खासदार संजय राऊत यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका

शेअर करा