मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Bhaskar Jadhav. : अतिवृष्टीवरील चर्चेतून मंत्र्यांची दांडी! - भास्कर जाधव यांचा सभागृहात तीव्र संताप, "शेतकऱ्यांना फसवी पॅकेजेस देऊ नका!"

Nagpur Winter Session : "एनडीआरएफचे निकष वाढवले का?" थेट जाब; "बिहारमध्ये मदत मागितली नव्हती, मग इथे प्रस्ताव कशाला?" केंद्रीय पथकाच्या पाहणीवरही हल्लाबोल

V
Vivek

1 मिनिट वाचन

Bhaskar Jadhav. : अतिवृष्टीवरील चर्चेतून मंत्र्यांची दांडी! - भास्कर जाधव यांचा सभागृहात तीव्र संताप, "शेतकऱ्यांना फसवी पॅकेजेस देऊ नका!"

Nagpur Winter Session : "एनडीआरएफचे निकष वाढवले का?" थेट जाब; "बिहारमध्ये मदत मागितली नव्हती, मग इथे प्रस्ताव कशाला?" केंद्रीय पथकाच्या पाहणीवरही हल्लाबोल

नागपूर :- राज्यातील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या बिकट परिस्थितीवर आज (11 डिसेंबर) विधानभवनामध्ये चर्चा सुरू असताना अनेक महत्त्वाच्या मंत्र्यांनी दांडी मारल्यामुळे शिवसेना (ठाकरे गट) नेते भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांनी महायुती सरकारवर जोरदार प्रहार केला. सलग दुसऱ्या दिवशी जाधव यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली, ज्यामुळे सत्ताधारी भाजप आमदारांनीही मंत्र्यांच्या अनुपस्थितीबद्दल खेद व्यक्त केला.

जाधव यांनी शेतकऱ्यांच्या मदतीच्या मुद्द्यावरून सरकारला घेरले. ते म्हणाले, "एनडीआरएफचे निकष तुम्ही वाढवले आहेत का? कापूस, संत्री, कांदा असेल किंवा कोकणामध्ये झालेले मोठे नुकसान, यावर सरकारने काय ठोस केले?" त्यांनी बिहारच्या मदतीचा दाखला देत सरकारला थेट जाब विचारला, "बिहारमध्ये कोणी मदत मागितली होती का? मग इथे कशाला प्रस्ताव मागता?"

शेतकऱ्यांसाठी दिली जाणारी मदत फसवी असल्याचे सांगत जाधव म्हणाले, "शेतकऱ्यांना तीन ते चार हेडखाली मदत दिली जाते, ज्याला पॅकेज म्हणतात, पण ही फसवी पॅकेजेस आहेत. 32 हजार कोटींचे पॅकेज दिले असे बोलतात, तर ते सभागृहात सांगा. पुन्हा असे फसवे पॅकेज देऊ नका."

केंद्रीय पथकाच्या पाहणीवरही जाधव यांनी हल्लाबोल केला. "केंद्रीय पथक कधी आलं होतं? दिवसा की रात्री? दिवसा त्यांनी पाहणी केली का?" अशी विचारणा करत त्यांनी पाहणीच्या सत्यतेवरच शंका घेतली. तसेच, "75 हजार कोटींच्या पुरवण्या मांडल्या गेल्या, याचा अर्थ तुमचे बजेट पुरतं कोलमंडलं आहे," असे म्हणत त्यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीवर चिंता व्यक्त केली. अतिवृष्टीमुळे नद्यांनी जमीन खरडून काढली आहे. त्यामुळे एका सीजनपुरती मदत करून चालणार नाही. सर्वांचा एकत्र अनुभव घेऊन ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत जाधव यांनी नोंदवले.

शेअर करा