मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Bhandup News : नाल्यालगतच्या घराची भिंत कोसळली; सकाळच्या वेळी हनुमान नगर हादरलं!

• भांडुपमध्ये 3 जण जखमी; 5 आणि 9 वर्षांच्या चिमुकल्यांचं सुदैवाने प्राण वाचले

V
Vivek

1 मिनिट वाचन

Bhandup News : नाल्यालगतच्या घराची भिंत कोसळली; सकाळच्या वेळी हनुमान नगर हादरलं!

•भांडुपमध्ये 3 जण जखमी; 5 आणि 9 वर्षांच्या चिमुकल्यांचं सुदैवाने प्राण वाचले

मुंबई, भांडुप | भांडुप पश्चिम येथील हनुमान नगर परिसरातील पंजाबी चाळमध्ये 24 जून रोजी सकाळी 7 वाजता एक गंभीर घटना घडली. नाल्यालगत असलेल्या घराची भिंत अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत एक वृद्ध महिला आणि दोन लहान मुले जखमी झाली असून, सुदैवाने मोठा अनर्थ टळला.

तातडीने रुग्णालयात हलवले; उपचार सुरू

भिंत कोसळल्याचा आवाज ऐकताच शेजाऱ्यांनी तत्काळ मदत केली. काही क्षणांतच घटनास्थळी महापालिकेच्या अग्निशमन दलासह पोलिस आणि 'एस विभागाचे अधिकारी पोहोचले.
जखमींची नावे पुढीलप्रमाणे:

1.वनिता विश्वास सावंत (वय 65)

2.योगेश मशीर पाल (वय 5)

3.मनीषा मशीर पाल (वय 9)

सर्व जखमींना तातडीने म. टि. अगरवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या बाह्यरुग्ण विभागात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली आहे.

हेही वाचा: Navi Mumbai Crime News : "अक्रोडात गूढ व्यापार!" 42 कोटींचा सीमाशुल्क घोटाळा उघड नवी मुंबईतील उद्योजक अटकेत

शेअर करा