मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Navi Mumbai Crime News : "अक्रोडात गूढ व्यापार!" 42 कोटींचा सीमाशुल्क घोटाळा उघड नवी मुंबईतील उद्योजक अटकेत

• चिलीहून आलेल्या 3630 टन अक्रोडांमागे सीमाशुल्क फसवणुकीचा मोठा डाव

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Crime News

•चिलीहून आलेल्या 3630 टन अक्रोडांमागे सीमाशुल्क फसवणुकीचा मोठा डाव

नवी मुंबई | चविष्ट अक्रोडाच्या पाकिटामागे असा धक्कादायक घोटाळा लपलेला असेल, यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. मात्र महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या (डीआरआय) कारवाईमुळे ४२ कोटी रुपयांच्या करचोरीचा भयानक प्रकार समोर आला आहे. नवी मुंबईतील एक व्यापारी चक्क 3,630 मेट्रीक टन अक्रोड परदेशातून आयात करून सरकारला कोट्यवधींचा चुना लावत होता.

नेरुळमधील 'ड्राय फ्रूट डॉन' अटकेत

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे आकाश अग्रवाल. तो नवी मुंबईच्या नेरूळ परिसरातील रहिवासी असून, एका ड्राय फ्रूट आयात करणाऱ्या कंपनीचा मालक आहे. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत या 'ड्राय फ्रूट डॉन'ने कर बुडवण्यासाठी चालवलेली क्लृप्ती समोर आली आहे.

अक्रोडांची कागदोपत्री किंमत कमी… हवालेने व्यवहार जादा!

चिली या देशातून आयात करण्यात आलेल्या अक्रोडांसाठी पुरवठादाराकडून घेतलेल्या बिलांपेक्षा 50 ते 70 टक्क्यांनी कमी किमती दाखवून सीमाशुल्क कमी भरण्यात आले. उर्वरित रक्कम चक्क 'हवाला' मार्गाने चिलीमध्ये पोहोचवण्यात येत असल्याचा डीआरआयला संशय आहे.

आयात मालाच्या कागदपत्रांमध्ये किंमत कमी दाखवायची, भारत सरकारकडून कमी कर आकारला जावा, आणि प्रत्यक्ष व्यवहार रोख स्वरूपात हवाला रॅकेटमार्फत चिलीला पाठवायचा – अशी बेमालूम गुंतवणूक साखळी तयार करण्यात आली होती. या संपूर्ण रचनेत आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास सुरू आहे.

या संपूर्ण आर्थिक फसवणुकीचा तपास महसूल गुप्तवार्ता संचालनालयाचे अधिकारी करत आहेत. आंतरराष्ट्रीय हवाला नेटवर्क, बनावट आयात बिलं, आणि परकीय चलन व्यवहार यांचा सखोल तपास सुरू असून, आकाश अग्रवालच्या बँक खात्यांची व त्याच्या इतर व्यावसायिक भागीदारांची चौकशी केली जात आहे.

हेही वाचा: Thane Bribe News : "ड्युटी मिळवायची तर पैसे द्यावे लागतात!" — ठाण्यात सुरक्षारक्षक सुपरवायझर लाच घेताना रंगेहात अटकेत

शेअर करा