मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Beed Railway Service : बीड रेल्वे सेवेचा शुभारंभ; पंकजा मुंडे म्हणाल्या, 'या भावना शब्दांच्या पलीकडच्या'

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा; गोपीनाथ मुंडे आणि बजरंग सोनवणे समर्थकांकडून जयघोष

V
Vivek

1 मिनिट वाचन

Beed Railway Service : बीड रेल्वे सेवेचा शुभारंभ; पंकजा मुंडे म्हणाल्या, 'या भावना शब्दांच्या पलीकडच्या'

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा; गोपीनाथ मुंडे आणि बजरंग सोनवणे समर्थकांकडून जयघोष

बीड :- अनेक दशकांपासून प्रतीक्षेत असलेल्या बीडच्या रेल्वे सेवेचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या ऐतिहासिक क्षणी भावना व्यक्त करताना मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, "बीडच्या रेल्वे सेवेचा शुभारंभ होत असतानाच्या भावना शब्दांच्या पलीकडच्या आहेत."

या सोहळ्यात बोलताना पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले. "पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी यासाठी विशेष तरतुदी केल्या. ज्यांनी ज्यांनी या रेल्वेमार्गासाठी संघर्ष केला, त्या सर्वांचेही मनापासून आभार," असे त्या म्हणाल्या.

राजकीय घोषणाबाजीने वेधले लक्ष

आज झालेल्या या उद्घाटनाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर रेल्वे बीडहून अहिल्यानगरकडे रवाना झाली. याच दरम्यान, रेल्वे स्थानकावर मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समर्थकांनी त्यांचे फोटो दाखवत 'मुंडे साहेब अमर रहे'च्या घोषणा दिल्या, तर दुसरीकडे खासदार बजरंग सोनवणे यांच्या समर्थकांनी 'दबंग खासदार' असे फलक झळकवत जयघोष केला.

अहमदनगर-बीड-परळी मार्गाचा महत्त्वाकांक्षी टप्पा

अहमदनगर-बीड-परळी या 261.25 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गातील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. रेल्वे अर्थसंकल्पात यासाठी २७५ कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली होती. अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर आणि नागरिकांच्या प्रयत्नानंतर बीडकरांचे रेल्वेचे स्वप्न अखेर प्रत्यक्षात आले आहे.

हेही वाचा: Raj Thackeray : मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकण्याचा प्रयत्न; राज ठाकरेंनी दिला 24 तासांचा अल्टिमेटम

शेअर करा