मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Beed Crime News : पाच हजाराची लाच स्वीकारणाऱ्या पोलीस हवलदाराला लाचलुचपत प्रतिबंध विभाग, यांनी केले अटक

Beed Crime News लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजी नगर यांची कारवाई ; लाचखोर हवालदाराला लाच रंगेहात पकडले

V
Vivek

1 मिनिट वाचन

Anti Corruption bureau News Pune

Beed Crime News लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजी नगर यांची कारवाई ; लाचखोर हवालदाराला लाच रंगेहात पकडले

थेट मुद्यावर:पोलीस हवालदार लाच घेताना अटक

बीड :- पोलिसांच्या वर्दीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. लाच स्वीकारणाऱ्या पोलीस हवालदाराला छत्रपती संभाजी नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या युनिटने रंगेहात अटक केली आहे. मारुती रघुनाथ केदार (35 वर्ष) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव असून चकलांबा पोलीस ठाणे, गेवराई बीड येथे ड्युटीवर होते.पाच हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रंगेहाथ पकडले आहे.

चंचल आणि पुन्नी:"लाच द्या किंवा मरो:भ्रष्ट हवालदाराची रंगीत पकड

तक्रारदार व त्यांचे चूलते यांच्यात शेतीच्या वादातून झालेल्या भांडणामुळे चकलांबा पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी अदखल पात्र गुन्ह्यांची नोंद झाली होती, त्यामध्ये प्रतिबंधक कारवाईमध्ये मदत करण्यासाठी आरोपी लोकसेवक यांनी पंचा समक्ष पाच हजार रुपये लाचेची मागणी करून पाच हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून लागलीच 21 मे रोजी पंचासमक्ष पाच हजार रुपये लाचेची रक्कम स्वतः स्वीकारली. आलोसे यांना लाच रकमेसह ताब्यात घेण्यात आले असून चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर,मुकुंद आघाव, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र. वि. छत्रपती संभाजी नगर, राजीव तळेकर, पोलिस उप अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर. यांच्या मार्गदर्शनाखाली विजयमाला चव्हाण, पोलीस निरीक्षक, ला.प्र. वि. छत्रपती संभाजी नगर, अमोल धस, पोलीस निरीक्षक, ला. प्र. वि . छत्रपती संभाजी नगर या अधिकाऱ्यांनी सापळा रचून पोलीस हवालदार सिंदकर , पोलीस अंमलदार युवराज हिवाळे, अंमलदार शिंदे, लाप्रवि. छत्रपती संभाजी नगर, यांच्या युनिटने आलोसे यांचे सक्षम अधिकारी- पोलीस अधीक्षक, बीड. या संपूर्ण प्रकरणात लाचखोर पोलीस हवालदार अटक केली आहे.

हेही वाचा: Panvel Breaking News : खारघरची वाहतूक कोंडी फुटणार! सेक्टर २ पासून महामार्गाला जोडणाऱ्या जोडरस्त्याचे काम सुरु ! आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रशासनाला निर्देश ! कीर्ती नवघरे यांच्या पाठपुराव्याला यश !

शेअर करा