मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Beed Bribe News : "सरपंचाची ‘विहीर’ लाचखोरीत बुडाली! सापळा रचून 10 हजार घेताना रंगेहात गजाआड!"

• ग्रामीण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी 20 हजार लाचेची मागणी

V
Vivek

1 मिनिट वाचन

ACB Trap News: “A deal of ten thousand… and a village servant in the trap!”

•ग्रामीण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी 20 हजार लाचेची मागणी

बीड | महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील जलसिंचन विहीर योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सरपंचाकडून वीस हजार रुपयांची लाच मागणी, आणि ती देखील दोन टप्प्यात! यातील पहिला हप्ता घेताना म्हणजे दहा हजार रुपये रोख रक्कम सरपंच रुक्मानंद खेत्रे ऊर्फ इलोसे (वय 47) यांना एसीबी बीडच्या पथकाने रंगेहात पकडत थरारक सापळा कारवाई केली.

तक्रारदाराच्या आईचे नाव जलसिंचन योजनेत लाभार्थी यादीत आल्यानंतर, पुढील मंजुरीसाठी सरपंच यांच्या 'ओळखीने काम करून देतो' या सबबीवर लाच मागितली. साऱ्या योजनेचा प्रस्ताव तयार करणे आणि मंजूर करून घेण्यासाठी त्याने "इंजिनिअरसाठी 10 हजार आणि मॅडमसाठी 10 हजार" अशी मागणी केली होती.

या तक्रारीवर विश्वास ठेवून एसीबी बीडच्या पथकाने माजलगावमध्ये सापळा रचला. आणि अखेर गजानन मंदिर रोडवरील राहत्या घरी इलोसे 10 हजार रुपये स्वीकारताना पंचासमक्ष जेरबंद झाला.

अंगझडतीत 53 हजार 450 रोख, मोबाईल फोन व मनगटातील घड्याळ सापडले. त्याचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला असून तपासासाठी झडती सुरू आहे. त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 च्या कलम 7A अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात येत आहे.

ही सापळा कारवाई पोलीस निरीक्षक राहुल भोळ यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. त्यांच्या पथकात सुरेश सांगळे, पांडुरंग काजगुंडे, अनिल शेळके आदींचा समावेश होता. पोलीस अधिक्षक अधिकारी संदीप आटोळे,अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव व पोलीस उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई झाली.

हेही वाचा: Kalpita Pimple : सहाय्यक आयुक्तांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या फेरीवाल्यास 7 वर्ष सक्त मजुरी!

शेअर करा