मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Beed Bribe News : लाच घेताना कनिष्ठ लिपिक रंगेहात पकडला – बीडमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची यशस्वी कारवाई

•जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात सापळा – पाच हजार रुपयांची लाच घेताना कारवाई

V
Vivek

1 मिनिट वाचन

Beed Bribe News

•जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात सापळा – पाच हजार रुपयांची लाच घेताना कारवाई

बीड :- भ्रष्टाचाराविरोधात लढा देणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बीड यांनी काल (20 मे) मोठी यशस्वी कारवाई करत सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक-2,बीड येथील कनिष्ठ लिपिक कृष्ण वसुदेव मुंडे (वय 37) यांना पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली.

तक्रारदार हे बेलगाव (ता. आष्टी) येथील 'जगदंबा देवी मजूर सहकारी संस्था' चे चेअरमन असून, संस्थेच्या नूतनीकरण प्रक्रियेसाठी आवश्यक वर्गीकरण पत्र मिळविण्यासाठी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावावर कार्यवाही करताना आरोपी लिपिकाने 7 मे 2025 रोजी पाच हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.

तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता, आरोपी लिपिकाने तक्रारदाराकडून स्वतःसाठी लाचेची मागणी करत असल्याचे स्पष्ट झाले. आज बीडच्या सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक2 च्या कार्यालयात सापळा रचण्यात आला. लिपिक मुंडे यांनी पंचासमक्ष लाचेची रक्कम स्वीकारली आणि त्यांना रंगेहात पकडण्यात आले.याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाणे, बीड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, आरोपीला अटक करण्याची कार्यवाही सुरू आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक किरण बगाटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकामध्ये पोलीस हवालदार गिराम, गोरे, गारदे, पोलीस शिपाई राठोड, गवळी, पुरी यांनी सहभाग घेतला. ही यशस्वी कारवाई संदीप आटोळे (पोलीस अधीक्षक), मुकुंद आघाव (अप्पर पोलीस अधीक्षक), व शंकर शिंदे (उपविभागीय पोलीस अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

हेही वाचा: Ajit Pawar : अजित पवार गटातील हे दिग्गज नेते 20 मे रोजी राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

शेअर करा