मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : बाणेर आगारातील वाहकाचा प्रामाणिकपणा पंचवीस हजारांचा मोबाईल प्रवाशाला परत

Pune News : पुणे महाराष्ट्र मिरर : कर्तव्य बजावत असताना सापडलेला सुमारे पंचवीस हजार रुपये किमतीचा मोबाईल स्वतःकडे न ठेवता तो संबंधित प्रवाशाला परत करून बाणेर आगारातील वाहकाने प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठेचा आदर्श घालून दिला.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

बाणेर आगारातील वाहकाचा प्रामाणिकपणा पंचवीस हजारांचा मोबाईल प्रवाशाला परत
बाणेर आगारातील वाहकाचा प्रामाणिकपणा पंचवीस हजारांचा मोबाईल प्रवाशाला परत

Pune News : पुणे महाराष्ट्र मिरर : कर्तव्य बजावत असताना सापडलेला सुमारे पंचवीस हजार रुपये किमतीचा मोबाईल स्वतःकडे न ठेवता तो संबंधित प्रवाशाला परत करून बाणेर आगारातील वाहकाने प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठेचा आदर्श घालून दिला. या प्रामाणिक सेवेबद्दल बाणेर आगार प्रशासनाच्या वतीने संबंधित वाहकाचे कौतुक करण्यात आले.https://maharashtramirror.com/ Pune News
बाणेर आगारातील कायम वाहक धोंडू तात्या सुभाष गिरी हे ३१ ऑगस्ट रोजी मार्ग क्रमांक ३४/३ वर काम करीत होते. यावेळी त्यांना प्रवाशाचा व्हीव्हो (VIVO) कंपनीचा मोबाईल फोन सापडला.https://maharashtramirror.com/ Pune News
मोबाईल सापडल्यानंतर गिरी यांनी तो स्वतःकडे न ठेवता तत्काळ बाणेर आगार प्रशासनाकडे जमा केला. त्यानंतर मोबाईलच्या मालकाचा शोध घेण्यात आला. सदर मोबाईल कैलास सदाशिव भोसले यांचा असल्याचे समजले. आवश्यक ती खातरजमा केल्यानंतर मोबाईल सुरक्षितपणे सदाशिव भोसले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.https://maharashtramirror.com/ Pune News
प्रवाशाच्या मौल्यवान वस्तूची सुरक्षितपणे परतफेड करून गिरी यांनी एसटी सेवेतील प्रामाणिकपणा, सचोटी आणि कर्तव्यनिष्ठेचे दर्शन घडविले. त्यांच्या या कृतीचे प्रवाशांकडूनही कौतुक होत आहे.
बाणेर आगार प्रशासनाच्या वतीने असि. डेपो मॅनेजर श्रीहरी ढाकणे यांनी गिरी यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. ‘प्रामाणिक सेवा – प्रवाशांचा विश्वास’ हा संदेश त्यांच्या कृतीतून अधोरेखित झाला.

शेअर करा