मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

बागपत घटना : निर्वाण महोत्सवादरम्यान स्टेज कोसळला, 7 जणांचा मृत्यू, 40 भाविक जखमी

• बागपतमध्ये भगवान आदिनाथांच्या निर्वाण लाडू उत्सवानिमित्त मानस्तंभ संकुलात लाकडी मचाण कोसळला.

V
Vivek

1 मिनिट वाचन

बागपत घटना : निर्वाण महोत्सवादरम्यान स्टेज कोसळला, 7 जणांचा मृत्यू, 40 भाविक जखमी

•बागपतमध्ये भगवान आदिनाथांच्या निर्वाण लाडू उत्सवानिमित्त मानस्तंभ संकुलात लाकडी मचाण कोसळला. त्यामुळे 50 हून अधिक भाविक गाडले गेले. 7 जणांचा मृत्यू झाला असून 40 जण जखमी झाले आहेत. पोलिस-प्रशासनाचे उच्चपदस्थ अधिकारी घटनास्थळी आहेत. बचावकार्य सुरू आहे.

ANI :- उत्तर प्रदेशातील बागपतमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथे मंगळवारी सकाळी भगवान आदिनाथांच्या निर्वाण लाडू उत्सवादरम्यान मानस्तंभ संकुलातील लाकडी मचाण कोसळला. त्यामुळे 50 हून अधिक भाविक गाडले गेले. या अपघातात 7 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर 40 जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर घटनास्थळी लगेचच चेंगराचेंगरी झाली.याशिवाय चेंगराचेंगरीवर नियंत्रण ठेवणारे 5 पोलीसही जखमी झाले आहेत.

बरौत शहरातील कोतवाली परिसरातील गांधी रोडवर हा भीषण अपघात झाला. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. डीएम अस्मिता लाल आणि एसपी अर्पित विजयवर्गीय हॉस्पिटलमध्ये पोहोचून जखमींची माहिती घेत आहेत.

श्री दिगंबर जैन पदवी महाविद्यालयाच्या मैदानावर बांधण्यात आलेल्या मानस्तंभाचे व्यासपीठ कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. आज येथे निर्वाण महोत्सवाअंतर्गत धार्मिक कार्यक्रम होणार होता, याठिकाणी 65 फूट उंच स्टेज बांधण्यात आला.त्याच्या पायऱ्या तुटल्या. त्यामुळे तेथे बांधलेला प्लॅटफॉर्म कोसळून अनेक भाविक त्याखाली गाडले गेले. त्यानंतर तेथे चेंगराचेंगरी झाली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या बचावकार्य सुरू आहे. घटनास्थळी पोलीस आणि प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बागपत जिल्ह्यातील घटनेची दखल घेतली. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्याला गती देण्याचे निर्देश दिले. जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. यासोबतच जखमींच्या लवकरात लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना केली आहे.

हेही वाचा: Ameya Khopkar : आयपीएल आणि चॅम्पियन्स ट्रॉफीची कॉमेंट्रीही मराठीत असावी, मनसे नेते अमेय खोपकर पोहोचले हॉटस्टारच्या कार्यालयात

शेअर करा