मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

'तू खूप मध्ये मध्ये येतोस, आज तुझा काटाच काढतो' म्हणत जीवे मारण्याचा प्रयत्न

जुन्या वादातून तरुणाला दोघांनी दिली दुचाकीने धडक

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

'तू खूप मध्ये मध्ये येतोस, आज तुझा काटाच काढतो' म्हणत जीवे मारण्याचा प्रयत्न

जुन्या वादातून तरुणाला दोघांनी दिली दुचाकीने धडक

पिंपरी: जुन्या वैमनस्यातून आणि वर्चस्वाच्या वादातून वाकड परिसरात दोन तरुणांनी एका तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. आरोपींनी आधी दुचाकीने धडक देऊन पीडित तरुणाला खाली पाडले आणि त्यानंतर लोखंडी रॉड तसेच बॅरिकेडने मारहाण करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी वाकड पोलिसांनी किरण दीपक विटकर (२५) आणि चेतन दीपक विटकर (२७, दोन्ही रा. १६ नंबर, पराग ज्वेलर्सच्या मागे, वाकड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील आरोपी किरण विटकर याला पोलिसांनी अटक केली आहे. या संदर्भात फिर्यादी निकेश बंडू क्षीरसागर (२२, रा. पवार इस्टेट, थेरगाव) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निकेश आणि आरोपींमध्ये जुना वाद सुरू होता. शुक्रवारी (१५ मे) दुपारी दोनच्या सुमारास निकेश कावेरीनगर सबवेच्या खालून पायी घराकडे जात होता. त्याचवेळी आरोपींनी त्याला अडवले. आरोपी किरणने मुद्दाम आपली मोटारसायकल निकेशच्या अंगावर घातली, ज्यामुळे तो रस्त्यावर पडला. यानंतर आरोपी चेतनने धमकी देत "तू खूप मध्ये मध्ये येतोस, आज तुझा काटाच काढतो," असे म्हटले. त्यानंतर आरोपींनी निकेशवर लोखंडी रॉडने हल्ला करत त्याच्या डोक्यावर गंभीर वार केले. तर दुसऱ्या आरोपीने जवळच पडलेले बॅरिकेड उचलून त्याच्या अंगावर फेकले. दोघांनी मिळून त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाकड पोलीस खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

शेअर करा