मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Ashwini Bhide : "मेट्रो वुमन" म्हणून ओळख असलेल्या सनदी अधिकारी अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रधान सचिव पदी नियुक्ती

Ashwini Bhide : आयएसएस अधिकारी अश्विनी भिडे सध्या मुंबईच्या मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी आहे

V
Vivek

1 मिनिट वाचन

Ashwini Bhide : "मेट्रो वुमन" म्हणून ओळख असलेल्या सनदी अधिकारी अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रधान सचिव पदी नियुक्ती

Ashwini Bhide : आयएसएस अधिकारी अश्विनी भिडे सध्या मुंबईच्या मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी आहे

मुंबई :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्या प्रधान सचिव पदी आयएसएस अश्विनी भिडे Ashwini Bhide यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अश्विनी भिडे यांना "मेट्रो वुमन" म्हणून ओळखले जाते. आयएसएस अधिकारी अश्विनी भिडे यांच्यावर सध्या मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक पदाची जबाबदारी आहे.

राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा यांनी शुक्रवारी एका विशेष आदेशांद्वारे त्यांची मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्याचे आदेश काढले.व्ही. राधा यांनी यासंबंधीच्या आदेशात म्हटले आहे की, श्रीमती अश्विनी भिडे, शासनाने आपली बदली केली असून, आपली नियुक्ती मुख्यमंत्री यांचेच प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई या पदावर ब्रिजेश सिंह, भापोसे यांच्या जागी केली आहे. तरी आपण नवीन पदाचा कार्यभार ब्रिजेश सिंह, भापोसे यांच्याकडून त्वरीत स्वीकारावा. तसेच पुढील आदेश होईपर्यंत आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभारही आपण धारण करावा.

कोण आहेत अश्विनी भिडे?

अश्विनी भिडे ह्या 1995 च्या बॅचच्या सनदी अधिकारी आहेत. त्यांना सनदी सेवेतील जवळपास 25 वर्षांचा अनुभव आहे.

त्यांनी आतापर्यंत राज्यभर विविध महत्त्वाची पदे भूषवली आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालयाच्या विभागीय अतिरिक्त आयुक्त, महाराष्ट्र शासनाच्या सहसचिव, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अतिरिक्त आयुक्तपद, तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. सध्या त्यांच्याकडे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी आहे.तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2015 मध्ये अश्विनी भिडे यांच्याकडे मुंबई मेट्रो-3 ची धुरा सोपवली होती. हा प्रकल्प कुलाबा - वांद्रे सिप्झ असा 33 किलोमीटरचा आहे. त्यात 26 स्टेशन अंडरग्राउंड बांधण्यात येणार आहेत. त्यांच्या नेतृत्वात मुंबई मेट्रोचे कामकाज अत्यंत वेगाने सुरू झाले. त्यामुळेच त्यांना 'मेट्रो वुमन' म्हणूनही ओळखले जाते

शेअर करा