मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Anjali Damania On Dhananjay Munde : अंजली दमानिया यांचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप; ‘दहशतीचं राजकारण आता संपलं’

•अजित पवारांच्या भूमिकेमुळे मुंडेंना धक्का?

V
Vivek

1 मिनिट वाचन

Anjali Damania On Dhananjay Munde : अंजली दमानिया यांचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप; ‘दहशतीचं राजकारण आता संपलं’

•अजित पवारांच्या भूमिकेमुळे मुंडेंना धक्का? ‘संतोष देशमुख प्रकरणानंतर जनभावनेमुळे राजीनामा’

मुंबई :- सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करत, त्यांचे राजकारण आता संपुष्टात आल्याचे म्हटले आहे. अजित पवार गटाकडून मुंडे यांना जाणीवपूर्वक बाजूला केले जात असल्याचा दावाही दमानिया यांनी केला आहे. या आरोपांमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

दमानिया यांनी आपल्या ट्विटमध्ये आणि माध्यमांशी बोलताना म्हटले आहे की, बीडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात पालकमंत्री अजित पवार उपस्थित असतानाही धनंजय मुंडे अनुपस्थित होते. याशिवाय, अजित पवार यांनी आपल्या भाषणात 'बड्या बापाचा बेटा असो, आका-काका असो, किंवा कोणीही असो, चौथ्यांदा चूक झाल्यास थेट मोका लावू' असे जे वक्तव्य केले, ते अप्रत्यक्षपणे मुंडे यांच्यावरच टीका करणारे असल्याचे दमानिया यांनी सांगितले.

संतोष देशमुख प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा जनभावनेमुळेच घेतला गेला, असे दमानिया यांनी स्पष्ट केले. ‘वरचा दबाव होता की नाही, याच्याशी मला काही देणेघेणे नाही. पण संतोष देशमुख यांच्यावर झालेल्या क्रूरतेचे फोटो समोर आल्यानंतर जनक्षोभामुळेच हा राजीनामा घेण्यात आला,’ असे त्या म्हणाल्या.

यासोबतच, ‘संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांचा सहभाग आढळला नाही’ ही बातमी मुंडे यांनीच स्वतःच्या कार्यकर्त्यांकडून पेरली असल्याचा थेट आरोपही त्यांनी केला. अजित पवार त्यांना बाजूला करत असल्यामुळे, राजकीय वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी ही बातमी पसरवली गेल्याचा त्यांचा दावा आहे. ‘धनंजय मुंडे संपले आहेत,’ असे जनतेच्या मनात जाऊ नये, यासाठी हा प्रयत्न करण्यात आल्याचे दमानिया म्हणाल्या. यावर धनंजय मुंडे किंवा त्यांच्या समर्थकांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही

हेही वाचा: Nashik News : नाशिकमध्ये मनसे-ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चेतच राडा; दोन नेत्यांमध्ये जोरदार वाद

शेअर करा