मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Anil Deshmukh : सीबीआय गुन्हा दाखल झाल्यानंतर अनिल देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया, 'मी भाजपचा …'

•माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाही.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Anil Deshmukh

•माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाही. आता सीबीआयने गिरीश महाजन प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

नागपूर :- सीबीआयने माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्यावर त्यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला असून, अशा धमक्या आणि दबावाला मी अजिबात घाबरत नाही, असे म्हणत अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

अनिल देशमुख यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जळगावचे तत्कालीन पोलिस अधीक्षक यांच्यावर दबाव आणल्याचा त्यांच्यावर आरोप असून, त्यासाठी सीबीआयने अनिल देशमुख यांना आरोपी बनवून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मी न घाबरता लढेन - अनिल देशमुख
धन्यवाद…
देवेंद्रजी फडणवीस

माझ्यावर CBI कडून आणखी एक तथ्यहीन गुन्हा दाखल केला गेला आहे. जनतेचा कौल बघून फडणवीसांच्या पायाखालची वाळू घसरल्याने हे कटकारस्थान सुरू झाले आहे. या अशा धमक्यांना आणि दबावाला मी अजिबात भीक घालत नाही. न झुकता - न डगमगता मी #BJP च्या या दडपशाही विरुद्ध लढण्याची खूनगाठ बांधली आहे.

महाराष्ट्रात फडणवीसांकडून किती खालच्या पातळीचे आणि विकृत मानसिकतेचे घाणेरडे राजकारण सुरू आहे ते जनतेने बघावे. लोकसभा निवडणुकीत या कारस्थानी नेतृत्वाला जनतेने जागा दाखवून दिली आहे, आता महाराष्ट्राची जनता विधानसभा निवडणुकीची वाट बघत आहे !

हेही वाचा: Thane Crime News : शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक! आमिषाला बळी तब्बल 45.88 लाख रुपयांची ऑनलाइन चोरी

शेअर करा