मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Amit Shah Pune Visit : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या (22 फेब्रुवारी) पुण्यात

• केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे 22 फेब्रुवारी रोजी पुणे दौऱ्यावर येणार असून, गृह विभागाच्या पश्चिम विभागीय बैठकीस उपस्थित राहणार,महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दादरा आणि नगर हवेली, दमण दीव येथील अधिकारी उपस्थित राहणार

V
Vivek

1 मिनिट वाचन

Amit Shah Pune Visit : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या (22 फेब्रुवारी) पुण्यात

•केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे 22 फेब्रुवारी रोजी पुणे दौऱ्यावर येणार असून, गृह विभागाच्या पश्चिम विभागीय बैठकीस उपस्थित राहणार,महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दादरा आणि नगर हवेली, दमण दीव येथील अधिकारी उपस्थित राहणार

पुणे :- केंद्रीय गृह विभागाची पश्चिम विभागीय बैठक उद्या शनिवारी 22 फेब्रुवारी रोजी होणार असून, त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुणे दौऱ्यावर येणार आहेत. प्रशासनाने मोठा फौजफाटा तैनात केले असून प्रशासन मोठ्या प्रमाणावर केंद्रीय गृहमंत्री यांच्या स्वागतासाठी सज्ज आहे.दरम्यान अद्याप शहा यांचा पुण्यात राजकीय कार्यक्रम होणार की नाही याबाबत स्पष्टता आलेली नाही.

पश्चिम विभागीय बैठक कोरेगाव पार्क भागातील पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार आहे. पश्चिम विभागीय बैठकीचे अध्यक्ष अमित शहा हे असणार असून, त्यात महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दादरा आणि नगर हवेली, दमण दीव येथील अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी बालेवाडी येथे होणाऱ्या कार्यक्रमाचे अध्यक्षपदही ते भूषवतील. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वाहतुकीत बदल आणि निर्बंधांची सूचना दिली आहे.

अधिसूचनेनुसार, पाषाण रोड, बाणेर रोड आणि औंध रोडवर संपूर्ण दिवस जड वाहनांना बंदी असेल. शिवाय, पुणे शहरात संथ गतीने चालणाऱ्या, अति जड वाहनांवर पूर्ण दिवस बंदी लागू केली जाईल.

हेही वाचा: छत्रपती संभाजी महाराजांवरील वादग्रस्त मजकूर, विकिपीडियाच्या संपादकांवर एफआयआर दाखल होणार!

शेअर करा