मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

छत्रपती संभाजी महाराजांवरील वादग्रस्त मजकूर, विकिपीडियाच्या संपादकांवर एफआयआर दाखल होणार!

• छत्रपती संभाजी महाराजांबद्दल विकिपीडिया पेजवर आक्षेपार्ह कमेंट करण्यात आल्याने महाराष्ट्रात तीव्र संताप व्यक्त होत असून आता पोलिसांनी कारवाईची तयारी केली आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

छत्रपती संभाजी महाराजांवरील वादग्रस्त मजकूर, विकिपीडियाच्या संपादकांवर एफआयआर दाखल होणार!

•छत्रपती संभाजी महाराजांबद्दल विकिपीडिया पेजवर आक्षेपार्ह कमेंट करण्यात आल्याने महाराष्ट्रात तीव्र संताप व्यक्त होत असून आता पोलिसांनी कारवाईची तयारी केली आहे.

मुंबई :- ओपन सोर्स प्लॅटफॉर्म विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांवर लिहिलेल्या वादग्रस्त मजकुराच्या संदर्भात मोठी माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र पोलिसांचा सायबर सेल विकिपीडियाच्या त्या सामग्रीच्या संपादकांविरुद्ध एफआयआर नोंदवणार आहे.महाराष्ट्र सायबर सेलने विकिपीडियाला मजकूर काढून टाकण्यासंदर्भात 10 हून अधिक मेल पाठवले होते परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

विकिपीडियावरून केवळ स्वयंचलित उत्तर आले आहे परंतु कोणतीही कारवाई केली गेली नाही. विकिपीडियाने सामग्री काढली नाही किंवा पोलिसांना प्रतिसाद दिला नाही. सूत्रांनी सांगितले की, विकिपीडियाने आयटी कायद्याच्या कलम 69 आणि 79 चे उल्लंघन केले आहे. या प्रकरणी आता विकिपीडियाच्या 4-5 संपादकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यांनी यापूर्वीच निर्देश कारवाई करण्याच्या निर्देश दिले होते. संभाजी महाराजांबद्दल विकिपीडियावर उपलब्ध आक्षेपार्ह माहिती पाहता फडणवीस यांनी कडक भूमिका घेतली होती. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र सायबर सेलला सूचनाही दिल्या होत्या.ज्यामध्ये वस्तुस्थितीचा विपर्यास करून मांडला जातो.

हेही वाचा: Sanjay Raut : 'आम्ही अरविंद केजरीवाल हरण्याची वाट पाहत होतो', संजय राऊत, 'आप'च्या पराभवाबाबत कोणाला लक्ष्य केले?

शेअर करा