मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Ambernath News :"लिफ्टमध्ये विकृतीचा कहर! अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण, हाताला चावा घेणाऱ्या रहिवाशावर गुन्हा"

•Ambernath Child Assault : सीसीटीव्हीत कैद झालेली संतापजनक घटना; आरोपीवर दोन गुन्हे दाखल

V
Vivek

1 मिनिट वाचन

Ambernath News :"लिफ्टमध्ये विकृतीचा कहर! अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण, हाताला चावा घेणाऱ्या रहिवाशावर गुन्हा"

•Ambernath Child Assault : सीसीटीव्हीत कैद झालेली संतापजनक घटना; आरोपीवर दोन गुन्हे दाखल

अंबरनाथ | अंबरनाथ पूर्वेतील पालेगाव परिसरात एका सोसायटीत घडलेली घटना समाजाची संवेदनशीलता हादरवणारी आहे. केवळ लिफ्टचा दरवाजा बंद केल्याच्या कारणावरून कैलास तनवाणी या रहिवाशाने एका अल्पवयीन मुलाला लिफ्टमध्ये बेदम मारहाण केली. इतकंच नव्हे तर, या विकृताने मुलाच्या हाताला चावा देखील घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ही घटना पटेल जियम सोसायटीत 4 जुलै रोजी सायंकाळी घडली. क्लाससाठी निघालेला अल्पवयीन मुलगा लिफ्टमध्ये असताना कैलास तनवाणी देखील लिफ्टमध्ये आला. त्या मुलाने दरवाजा बंद करत असल्याचा राग काढत कैलास याने त्याला "तू मोहितचा दोस्त आहेस का?" असा प्रश्न विचारून, पाच वेळा कानशिलात लगावल्या. या हल्ल्यापासून वाचण्यासाठी मुलाने हात पुढे केला असता, तनवाणीने त्या हातालाही चावा घेतला.

या हल्ल्यात कैलासच्या हातात असलेल्या मोबाईल आणि चाव्यांमुळे मुलाच्या शरीराला गंभीर आतील दुखापती झाल्या असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.संपूर्ण प्रकार लिफ्टमधील सीसीटीव्हीत स्पष्टपणे कैद झाला असून, पालकांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. मात्र सुरुवातीला पोलिसांनी या घटनेचं गांभीर्य न लक्षात घेत अदखलपात्र गुन्हा नोंदवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. सततच्या पाठपुराव्यानंतर कैलास तनवाणी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

याच घटनेनंतर कैलासच्या पत्नीनेही कौटुंबिक वादातून त्याच्याविरोधात स्वतंत्र तक्रार दाखल केली असून, दोन वेगवेगळे गुन्हे त्याच्यावर नोंदवले गेले आहेत.

हेही वाचा: Navi Mumbai News : "नवी मुंबईत ड्रग्ज टोळीचा पर्दाफाश! 47 लाखांचे हेरॉईन जप्त – 9 जण अटकेत"

शेअर करा