मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Ambadas Danve : राज्यात काय रझाकारी आहे का? असा सवाल राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केलाय

•मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे छत्रपती संभाजी नगराच्या दौऱ्यावर असल्याने पोलीस भरती स्थगित केल्यामुळे Ambadas Danve संतापले

V
Vivek

1 मिनिट वाचन

ambadas danve suspended

•मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे छत्रपती संभाजी नगराच्या दौऱ्यावर असल्याने पोलीस भरती स्थगित केल्यामुळे Ambadas Danve संतापले

छत्रपती संभाजीनगर :- राज्यात रझाकरी चालू आहे का? असा सवाल उपस्थित करत अंबादास दानवे यांनी प्रशासनाला जाब विचारला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजी नगरच्या दौऱ्यावर असल्याने कडे कोट बंदोबस्ता करिता मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मनुष्य अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलीस भरती रद्द करण्यात आल्याने अंबादास दानवे हे संतप्त झाले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येत आहेत. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात त्यांच्या हस्ते महिलांसाठी विविध योजनांचे प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, त्यांच्या या दौऱ्यामुळे नागरिकांना वेठीस धरण्यात येत आहे. जळगाव रोड वरील दहा किलोमीटर परिसरातील वाहतूक यामुळे वळवण्यात आली आहे. त्यामुळे वाहनधारकांना 40 किलोमीटर जास्तीचा फेरा पडणार आहे. त्यातच आता पोलिस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना ऐनवेळी भरती रद्द करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे याविषयी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. मुख्यमंत्र्यांचा दौरा आधीच ठरलेला असताना ऐनवेळी विद्यार्थ्यांना हा निरोप का देण्यात आला? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

विरोधी पक्ष नेते Ambadas Danve काय म्हणाले?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यावर राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संतप्त सवाल उपस्थित केला आहे. या संबंधी ते म्हणाले की, मी पोलिस आयुक्तशी बोललो. त्यांनी मनुष्य बळाअभावी भरती रद्द केल्याचे कबुल केले आहे. मात्र अडीच हजार विद्यार्थी येतात, त्यांचे येणे - जाणे, राहणे खाणे, प्रवास खर्च होतो, त्यानंतर पोलिस आयुक्तांच्या मनात आल्यानंतर ऐनवेळी भरती रद्द केल्याची एक नोटीस लावण्यात येते. हे योग्य नाही. ही काय रझाकारी आहे का? पोलिस आयुक्तांच्या घरचे राज्य आहे का? मला असे वाटते की हा अडीच हजार विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय आहे.

शेअर करा