मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Ambadas Danve : छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा! अंबादास दानवेंनी पकडली भाजप उमेदवाराची कॉलर; पंचायत समिती निवडणुकीत तुफान हाणामारी

Ambadas Danve On BJP : ठाकरे गटाचे 3 सदस्य पळवल्याचा आरोप; दानवेंचा भाजप उमेदवाराला भररस्त्यात जाब, शिंदे गटातही फुटीचा दावा

V
Vivek

1 मिनिट वाचन

ambadas danve suspended

Ambadas Danve On BJP : ठाकरे गटाचे 3 सदस्य पळवल्याचा आरोप; दानवेंचा भाजप उमेदवाराला भररस्त्यात जाब, शिंदे गटातही फुटीचा दावा

छत्रपती संभाजीनगर :- जिल्ह्यात पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडणुकीने हिंसक वळण घेतले आहे. ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने झालेल्या मोठ्या राड्यामुळे राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजप उमेदवाराची कॉलर पकडून त्यांना मारहाण केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

'शिवसेना स्टाईल'ने जाब विचारला - अंबादास दानवे

ठाकरे गटाचे तीन सदस्य भाजपने पळवून नेल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. गायब झालेल्या सदस्यांमध्ये लताबाई कानडे (पंढरपूर गण), सतीश हिवाळे (वडगाव कोल्हाडी) आणि दत्तात्रय वर्षे यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया देताना अंबादास दानवे म्हणाले, "भाजपचे लोक कुठे पैशांचे आमिष दाखवून तर कुठे धमक्या देऊन आमचे सदस्य उचलून नेतात. लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या या लोकांना उत्तर देणे गरजेचे होते, म्हणूनच मी भाजप उमेदवाराला पकडले आणि त्यांच्या कानाखाली वाजवली. ही शिवसेना आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे."

शिंदे गटातही फूट असल्याचा दावा

दानवे यांनी केवळ भाजपवरच नव्हे, तर शिंदे गटावरही निशाणा साधला आहे. "भाजपने केवळ आमचेच नाही, तर शिंदे गटाचे सदस्यही आपल्या ताब्यात ठेवले आहेत. सध्या शिंदे गटातही दोन गट पडले असून तिथे मोठी फूट आहे," असा दावा त्यांनी केला.

गायब सदस्यांना कडक इशारा

अविरत मेहनत करून शिवसैनिकांनी निवडून दिलेले सदस्य जर पक्षाशी गद्दारी करत असतील, तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा दानवे यांनी दिला आहे. "जे सदस्य कालपासून 'नॉटरिचेबल' आहेत, आम्ही त्यांची वाट पाहत आहोत. त्यांनी पक्षाच्या ध्येयधोरणानुसार वागावे, अन्यथा पक्षाला त्यांच्यावर कडक कारवाई करावी लागेल," असे त्यांनी स्पष्ट केले.

शेअर करा