मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Ambadas Danve : विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे विधान भवनात, निलंबनानंतर अंबादास दानवे सभागृहात बोलणार

•विरोधी पक्षनेते Ambadas Danve यांच्या निलंबन कालावधी कमी केल्यानंतर आज विधान परिषदेत अंबादास दानवे भूमिका मांडणार

V
Vivek

1 मिनिट वाचन

Ambadas Danve

•विरोधी पक्षनेते Ambadas Danve यांच्या निलंबन कालावधी कमी केल्यानंतर आज विधान परिषदेत अंबादास दानवे भूमिका मांडणार

मुंबई :- शिवसेना ठाकरे गटाचे नेते विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांना पाच दिवसाचा कालावधीसाठी निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर अंबादास दानवे आज विधिमंडळात उपस्थित राहिले प्रसार माध्यमाचे संवाद साधताना ते म्हणाले की,माझ्यावर एकतर्फी कारवाई झाली. आता तीन दिवसांची कसर भरून काढणार असे म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. अंबादास दानवे आजपासून सभागृहात उपस्थित आहेत. गुरुवारी त्यांच्या निलंबनाचा कालावधी तीन दिवसांचा करण्यात आला. त्यांनी उपसभापतींना दिलगिरीचे पत्र दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. ते आजपासून सभागृहात उपस्थित असून अधिवेशनाच्या आधी विरोधकांच्या आंदोलनात ते सहभागी झाले होते.

विरोधी पक्षनेत्या शिवाय सभागृह चालवणे चूक अधिवेशनाच्या आधी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी निलंबनाच्या कारवाईबाबत त्यांनी भाष्य केले आहे. "माझ्यावर एकतर्फी कारवाई झाली होती. विरोधी पक्षनेत्या शिवाय सभागृह चालवणे ही चूक आहे. सभागृह चालवणे ही उपसभापती, सत्ताधारी, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि इतर सर्वांची जबाबदारी असते. मात्र केवळ मला एकट्याला जबाबदार धरले गेले. या तीन दिवसांची कसर भरून काढत सरकारला धारेवर धरणार" असे दानवे म्हणाले.

शेअर करा