मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

प्रधानमंत्री आवास योजनेच्या साइटवरुन अॅल्युमिनियम प्लेट चोरी

पाच जणांना अटक; ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

प्रधानमंत्री आवास योजनेच्या साइटवरुन अॅल्युमिनियम प्लेट चोरी

पाच जणांना अटक; ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे: चाकण परिसरातील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या बांधकाम साईटवरून अॅल्युमिनियम प्लेट चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. १० ते १६ एप्रिलदरम्यान राक्षेवाडी येथे ही चोरी झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली. त्‍यांच्‍याकडून चोरीस गेलेल्‍या प्‍लेटसह एकूण ३१ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

रामरक्षा उर्फ राजू धर्मराज पासवान (४०, सुसगाव, ता. मुळशी), स्वराज शांताराम कालापाड (२३), स्वप्नील शांताराम कालापाड (२५), अक्रम रफिकउल्ला खान (२८, तिघेही रा. येलवाडी, ता. खेड, जि. पुणे) आणि अतुल संभाजी सोनवणे (३३, लोणीकंद, ता. हवेली, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्‍या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

चाकण परिसरातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या बांधकाम साईटवरून अज्ञात चोरट्यांनी २० लाख रुपये किमतीच्या अॅल्युमिनियम सेट्रींग प्लेटची चोरी केली होती. तपासादरम्यान घटनास्थळाजवळ एक बेवारस मोटारसायकल मिळाली. त्याच्या आधारे तांत्रिक तपास करण्यात आला. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली. यावरून आरोपींचा माग काढण्यात यश आले.

चौकशीत आरोपींनी चोरीचा मुद्देमाल विक्री केल्याची कबुली दिली. कात्रज येथील भंगार विक्रेत्याला हा माल विकण्यात आला होता. त्यानंतर हा माल पुढे चाकण आणि शिक्रापूर येथे विक्रीस काढण्यात आला. या साखळीचा तपास करत पोलिसांनी चोरीस गेलेल्‍या २० लाखांच्‍या प्‍लेटसह दोन दुचाकी आणि टेम्‍पोसह एकूण ३१ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या गुन्ह्यातील दोन परराज्यातील आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे

Aluminum plate stolen from Pradhan Mantri Awas Yojana site

शेअर करा