मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Akola News : अकोल्यात गणपती विसर्जन मिरवणुकीत दगडफेक, 68 जण ताब्यात

Akola Ganpati Incident : अकोल्यात गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी मिरवणूक काढण्यात येत होती, मात्र मिरवणुकीदरम्यान काही विसंगत घटकांच्या चुकीच्या कारवायांमुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Akola

Akola Ganpati Incident : अकोल्यात गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी मिरवणूक काढण्यात येत होती, मात्र मिरवणुकीदरम्यान काही विसंगत घटकांच्या चुकीच्या कारवायांमुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.

अकोला :- अकोल्यात 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी धार्मिक मिरवणुकीत Akola Ganpati वातावरण तणावपूर्ण बनले होते. अकोल्यातील नंदीपेठ येथे समाजकंटकांनी दगडफेक केल्याने तेथील कर्तव्यावर असलेले काही अधिकारी व स्थानिक जखमी झाले. दुपारच्या दरम्यान ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. दगडफेक करणाऱ्या 68 जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. अकोल्यात सध्या शांतता असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन स्थानिकांना केले आहे.

अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात गणपती विसर्जन मिरवणुकीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नंदीपेठ परिसरात एका धार्मिक स्थळाजवळून जाणाऱ्या गणपती मिरवणुकीवर दुसऱ्या समाजाने 5 मिनिटे दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे.

दोन्ही गट समोरासमोर दिसले. या घटनेनंतर मिरवणूक काही काळ थांबवण्यात आली. मात्र, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. अकोला एसीपी अनमोल मित्तल यांनी सांगितले की, काही काळ दगडफेक झाला, मात्र पोलिसांनी तत्परतेने कारवाई करून तणाव शांत केला आणि मिरवणूक पुन्हा सुरू केली.

अकोट शहरातील नंदीपेठ परिसरात काल (18 सप्टेंबर) दुपारी 4 वाजता ही घटना घडली, त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अतिरिक्त फौजफाटा मागवावा लागला. दगडफेकीच्या आरोपाखाली पोलिसांनी 68 जणांना ताब्यात घेतले असून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हेही वाचा: Kangana Ranaut : कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी'च्या रिलीजवर लवकरच निर्णय घ्यावा… मुंबई उच्च न्यायालयाची सीबीएफसीला फटकार

शेअर करा