मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट!

Ajit Pawar And His Family Meet PM Modi : नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी घेतली भेट

V
Vivek

1 मिनिट वाचन

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट!

Ajit Pawar And His Family Meet PM Modi : नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी घेतली भेट

नवी दिल्ली :- राज्यात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर महायुतीकडून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार Ajit Pawar आणि एकनाथ शिंदे Eknath Shinde यांचे निवड करण्यात आली आहे. आमदारांच्या शपथविधीच्या कार्यक्रमानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार हा रखडला असून मागील दोन ते तीन दिवसांपासून अजित पवार आपल्या राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांसोबत दिल्ली ठाण मानून बसले आहे. अजित पवार यांनी काल काका शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

छायाचित्रे · 1/2

Arrow Keys ⟵ ⟶

अजित पवार आपल्या सहकुटुंब देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान अजित पवार यांची पत्नी राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार आणि पुत्र पार्थ पवार हे देखील यावेळी उपस्थित होते. अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून जवळपास अर्धा तास चर्चा केल्याचे म्हटले आहे.

राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला असून शनिवारी 14 डिसेंबरला विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदाच्या मंत्रिमंडळामध्ये महत्त्वाचे खाते मिळावे याकरिता अजित पवार यांनी मागील तीन ते चार दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून बसले आहे. अजित पवार अर्थमंत्री आणि गृह खात्यावर दावा करत असल्याचे सर्वत्र चर्चा आहे. 16 डिसेंबर पासून महायुती सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन नागपुरात पार पाडणार आहे त्यापूर्वी मंत्रिमंडळाकरिता विस्तार व्हावा यासाठी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडून दिल्ली वारी करण्यात येत आहे.

शेअर करा