मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Ajit Pawar And Devendra Fadnavis Birthday : राज्याच्या दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांचे वाढदिवस

•उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस, सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा

V
Vivek

1 मिनिट वाचन

Ajit Pawar And Devendra Fadnavis Birthday : राज्याच्या दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांचे वाढदिवस

•उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस, सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा

मुंबई :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज (22 जुलै) वाढदिवस आहे.वाढदिवसानिमित्त अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांचा वाढदिवस सुनेत्रा पवार यांनी खास पद्धतीने साजरा केला.

अजित पवार यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी झाला. या खास प्रसंगी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी त्यांना खास शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनी पती अजित पवार यांना पांढरा गुलाब भेट दिला आहे. याचा फोटोही अजित पवारांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटोंमध्ये दोघेही हसताना दिसत आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिले, "महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि माझे सहकारी अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा."

आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही वाढदिवस आहे. त्यांचे अभिनंदन करताना अजित पवार यांनी लिहिले, "माझे सहकारी, मित्र आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुमच्या दीर्घायुष्यासाठी मी प्रार्थना करतो."

तर सुप्रिया सुळे यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!….राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!..आदित्य ठाकरे यांनीही वाढदिवसाच्या निमित्त दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिले शुभेच्छा.

हेही वाचा: PM Modi On Budget Session : 'जितक्या लढाया लढाव्या लागल्या…', अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी पंतप्रधान मोदींचा विरोधी खासदारांना थेट संदेश

शेअर करा